शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

सातारा जिल्ह्यातील माण तालुका भूकंपाने हादरला, १५ घरांना तडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 11:25 IST

माण तालुक्यात प्रथमच भूकंपाचे धक्के जाणवले

दहिवडी (जि. सातारा): माण तालुका रविवारी भूकंपाच्या धक्क्याने हादरला. तालुक्यातील तीन गावांत या भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे सुमारे १५ घरांना तडे गेले आहेत. दरम्यान, कोयना भूकंप मापकावर दोन धक्क्यांची नोंद झाली असून, सर्वात मोठा धक्का हा ३.४ रिश्टर स्केलचा होता.कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचा धक्का जाणवतो. पण, माण तालुक्यात वर्षानुवर्षे धक्के जाणवत नाहीत. मात्र, रविवारी दिवसभरात दोन धक्के जाणवले. तालुक्यातील पळशी, धामणी आणि ढाकणी परिसरात भूकंपाचा धक्का बसला. सकाळी १० वाजून ३१ मिनिटांनी पहिला धक्का जाणवला. या धक्क्याची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी होती, तर सातारा शहरापासून पूर्वेकडे ७३.६ किलोमीटर अंतरावर हा धक्का जाणवला. त्यानंतर सायंकाळी ४ वाजून ४९ मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. या धक्क्याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल होती. हा धक्का साताऱ्यापासून ६८.८ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाच्या दोन्हीही धक्क्यांची नोंद कोयनानगर येथील भूकंप मापकावर झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEarthquakeभूकंप