मलकापूरच्या रोटरी क्लब "यशस्विनी"ची पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:45 IST2021-08-18T04:45:56+5:302021-08-18T04:45:56+5:30
कऱ्हाड तालुक्यात दक्षिण मांड नदीकाठावर मनव व नांदगाव ही गावे वसलेली आहेत. या दोन्ही गावांना यंदा प्रथमच पुराचा ...

मलकापूरच्या रोटरी क्लब "यशस्विनी"ची पूरग्रस्तांना मदत
कऱ्हाड तालुक्यात दक्षिण मांड नदीकाठावर मनव व नांदगाव ही गावे वसलेली आहेत. या दोन्ही गावांना यंदा प्रथमच पुराचा फटका बसला. शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले, पण त्याचबरोबर नांदगावमधील ५३ व मनवमधील ३५ कुटुंबांना घरात पाणी जाऊन प्रत्यक्ष फटका बसला आहे. मनव व नांदगाव येथील पुराचे गांभीर्य लक्षात घेऊन मलकापूर येथील रोटरी क्लब यशस्विनीने मदतीचा हात पुढे केला. त्यांनी दोन्ही गावांतील सुमारे ४५ कुटुंबांतील सदस्यांना धान्याचे किट, महिलांना साड्या, लहान मुलांना कपडे आधी साहित्याचे वितरण केले.
यावेळी क्लबच्या अध्यक्षा उज्ज्वला कदम, मधुरा राऊत, वर्षा झेले, पौर्णिमा सोनवणे, वैशाली पाटील, सुनीता पाटील, कविता कचरे, कोमल पुजारी, अश्विनी कांबळे, जोगेश्वरी जोशी, राधिका गुने, संजीवनी यादव, श्रृती जोशी, शुभांगी पाटील, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, कैलास कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.