पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाबळेश्वरला रोल मॉडेल बनवा

By Admin | Updated: July 19, 2016 00:14 IST2016-07-18T23:08:37+5:302016-07-19T00:14:26+5:30

शंभराज देसाई : कोळी आळी समाज मंदिरात कार्यक्रम

Make Mahabaleshwar a role model to attract tourists | पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाबळेश्वरला रोल मॉडेल बनवा

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाबळेश्वरला रोल मॉडेल बनवा

महाबळेश्वर : ‘भविष्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची क्षमता यावी यासाठी महाबळेश्वरचा विकास करताना एक रोल मॉडेल बनेल याची सत्ताधारी गटाने दक्षता घेतली पाहिजे ही अपेक्षा पालिकेवर भगवा फडकल्याशिवाय पूर्ण होणार नाही म्हणून येथील जनतेने शिवसेनेच्या पाठीशी राहावे,’ असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये असलेले किसनराव खामकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त कोळी आळी समाज मंदिरात आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार अनंत तरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्ती निमित्त समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. शंभूराज देसाई हे बोलत होते.
व्यासपीठावर शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी सभापती धोंडिराम बापू जाधव, उपजिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, नगरसेवक संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर किसनराव खामकर यांचा आमदार शंभूराज देसाई, माजी आमदार अनंत तरे, डी. एम. बावळेकर, राजेश कुंभारदरे आदी मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक संतोष आबा शिंदे, माजी नगराध्यक्ष प्रभाकर देवकर, युसूफ शेख, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, तालुका प्रमुख यशवंत घाडगे, शहर प्रमुख विजय नायडू, कोरे, गोपाळ लालबेग आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी विमलताई ओंबळे, लिलाताई शिंदे, बाळाकृष्ण कोंढाळकर, समीर सुतार, दिलीप रिंगे, मधुकर साळुंखे, राजेंद्र सपकाळ, दयानंद सपकाळ, राजेंद्र करुंदे, बाळासाहेब नाविलकर, शंकर जांभळे, ओंकार नाविलकर, संतोष पवार, राजू शिर्के , संतोष चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Make Mahabaleshwar a role model to attract tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.