शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांची दैना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 13:56 IST

शेतात पाणी साठल्याने आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. सातारा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सहकारी साखर कारखान्यांची ऊसतोड बंद झाली असून द्राक्ष बागायतदारांनाही मोठा फटका बसला आहे. गहू आणि हरभरा पेरणी झाल्यानंतर शेतात पाणी साठल्याने आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. या नुकसानीची सरकारने दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. सातारा, कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, वाई, खंडाळा यासह फलटण आणि माण, खटावमध्येही पाऊस सुरु असल्याने त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कऱ्हाड परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी साठून राहिले आहे. त्यामुळे गहू आणि हरभऱ्याची केलेली पेरणी वाया जाण्याची भीती आहे.

कऱ्हाड तालुक्यात पाचवड फाटा येथे शेतात आणि सेवा रस्त्यावर पाणी साचले आहे. शेतात पाणी साचल्यामुळे ऊसतोड बंद झाली असून ऊसतोड मजूरांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. ऊसतोड मजूरांच्या झोडपड्यांमध्येही पाणी शिरले असून आता त्यांना त्यांचा संसार शेताच्या बांधावर थाटावा लागला आहे. अनेकांनी रात्रभर जागूनच काढली. रेठरे वाठार येथील रस्त्यावरही पाणी आले आहे. नारायणवाडी येथील शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले असून कराड - ओंड रस्त्यावर पाणी आल्याने पाचवड फाटा येथील दुकानात पाणी शिरले आहे. कराड येथील दत्त चौकातील दुकानांमध्येही पाणी शिरले आहे.सातारा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून सकाळी साडे दहा वाजेपर्यंत ४०. १ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३०. ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी ( मि. मी. )सातारा - ४०.१ मि. मी.जावळी - ५. ८ मि. मी.पाटण - ३१. ९ मि. मी.कराड - २९. १ मि. मी.कोरेगाव - २४. २ मि. मी.खटाव - वडूज - २४. ८ मि. मी.माण - दहिवडी - ३२. ८ मि. मी.फलटण - २५. ६ मि. मीखंडाळा - २७.१ मि. मी.वाई - ३०. ८ मि. मी.महाबळेश्वर ३७.७ मि. मी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी