जिल्हा कृषी विकास अधिकारीपदी माईनकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:44 IST2021-08-12T04:44:29+5:302021-08-12T04:44:29+5:30
सातारा : जिल्हा परिषदेअंतर्गत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू असून आता जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांची सांगलीला बदली ...

जिल्हा कृषी विकास अधिकारीपदी माईनकर
सातारा : जिल्हा परिषदेअंतर्गत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू असून आता जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांची सांगलीला बदली झाली आहे. त्यांच्या जागी विजय माईनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार नुकतीच महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांची अहमदनगरला बदली झाली, तर त्यांच्या जागी रोहिणी ढवळे यांची नियुक्ती झाली होती, तसेच वाई गटविकास अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. आता जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांची बदली झाली आहे. पवार हे याच पदावर सांगलीत रुजू होणार आहेत, तर पवार यांच्या जागेवर जालना येथील कृषी उपसंचालक विजय माईनकर यांची नियुक्ती झाली आहे. लवकरच माईनकर हे पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, माईनकर यांनी यापूर्वीही जिल्हा कृषी विकास अधिकारी पदाचा कार्यभार पाहिला आहे. ते सातारा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.
....................................................