सातारा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींवर महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:17+5:302021-02-05T09:16:17+5:30
सातारा : सातारा तालुक्यातील बहुतांश मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद महिलांसाठी राखीव झालेले आहे. आरक्षणासाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्या दिग्गज इच्छुकांचे ...

सातारा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींवर महिलाराज
सातारा : सातारा तालुक्यातील बहुतांश मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद महिलांसाठी राखीव झालेले आहे. आरक्षणासाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्या दिग्गज इच्छुकांचे मनसुबे आरक्षणामुळे धुळीला मिळाले आहेत.
तालुक्यातील नुकत्याच निवडणूक झालेल्या १३० व आगामी काळात होणाऱ्या ६६ ग्रामपंचायतींसाठी तहसीलदार आशा होळकर यांच्या अध्यक्षतेखाली शेंद्रे येथील अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या सांस्कृतिक संकुलामध्ये आरक्षण सोडत पार पडली.
तालुक्यातील वेणेखोल, क्षेत्र माहुली, निनाम, संगम माहुली, नुने, वाढे, जांभे, वर्ये, दरे तर्फ परळी या ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जातीमधील महिलांना सरपंच पदावर संधी मिळाली.
लावंघर, किडगाव, सैदापूर, गोजेगाव, कासारस्थळ, पानमळेवाडी, पळसावडे, मालगाव, मर्ढे, शेरेवाडी, लुमणेखोल, पिलाणीवाडी, निगडी वंदन, देशमुखनगर, धोंडेवाडी, अरे तर्फ परळी, अंगापूर वंदन, जोतिबाचीवाडी, भैरवगड, सारखळ, सोनवडी, केळवली, पिंपळवाडी, गोगावलेवाडी, कामेरी, कारी, तासगाव, राजापुरी, बोपोशी, शिवथर, उपळी, खावली, कुशी, तुकाईचीवाडी, गणेशवाडी, विजयनगर, देगाव, वासोळे, खोजेवाडी, वळसे, भरतगाववाडी, रेवंडे, सांबरवाडी, माजगाव, कुस खुर्द, करंजे तर्फ परळी, न्हाळेवाडी, वडूथ, ठोसेघर, कुमठे, कुरुण, पाटेश्वरनगर, बोरखळ, बनघर, सोनगाव सं निंब, कोंदणी-नरेवाडी, आगुंडेवाडी, समर्थगाव, शेळकेवाडी, गवडी, कुरुळबाजी या ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना संधी मिळाली.
झरेवाडी, आसगाव, वेचले, शिंदेवाडी, खेड, यादववाडी, लिंब, नागठाणे, रामनगर, महागाव, सायळी, भरतगाव, अंबवडे बु., निगुडमाळ, पाटेघर, म्हसवे, कातवडी बु., काशीळ, धनगरवाडी, मांडवे, आरफळ, मुग्दुलभटाचीवाडी, आलवडी, बेंडवाडी, जकातवाडी, कोंढवली, सोनगाव तर्फ सातारा या ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे.
नांदगावमध्ये अनुसूचित जमातीला संधी
तालुक्यातील एकमेव नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमातीची जागा होती. या ग्रामपंचायतीमध्ये २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत स्त्री राखीव होते. या ठिकाणी आता अनुसूचित जमातीचा पुरुष सरपंच होणार आहे. दरम्यान, आरक्षण खुले झाले नसल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण
तालुक्यातील शेंद्रे, भोंदवडे, आरळे, वेळे, नागेवाडी, निसराळे, यवतेश्वर, चाळकेवाडी, फडतरवाडी यासह २६ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाकडे सरपंचपद गेले, तर मालगाव, मर्ढे, किडगाव, लावंघर, सैदापूर, देशमुखनगर, देगाव, वळसे, भरतगाववाडी या ग्रामपंचायतींमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या सदस्यांचा हिरमोड झाला आहे.
सातारा तालुक्यातील आरक्षण असे...
अनुसूचित जाती : २१, अनुसूचित जमाती : १, नागरिकांचा मागास प्रवर्ग : ५३, सर्वसाधारण प्रवर्ग : १२१ एकूण : १९६