महावीर जयंती साध्या पद्धतीने घरीच साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:35 IST2021-04-26T04:35:42+5:302021-04-26T04:35:42+5:30

तरडगाव : विश्वाला अहिंसेची शिकवण देणारे भगवान महावीर यांची जयंती तरडगाव (ता. फलटण) येथील सकल दिगंबर जैन समाजाच्या बांधवांनी ...

Mahavir Jayanti is celebrated in a simple way at home | महावीर जयंती साध्या पद्धतीने घरीच साजरी

महावीर जयंती साध्या पद्धतीने घरीच साजरी

तरडगाव : विश्वाला अहिंसेची शिकवण देणारे भगवान महावीर यांची जयंती तरडगाव (ता. फलटण) येथील सकल दिगंबर जैन समाजाच्या बांधवांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या भयानक परिस्थितीची जाणीव ठेवत घरी राहूनच साध्या पद्धतीने साजरी केली.

येथील पुरातन जैन मंदिरातील महावीर यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. दरम्यान, सकाळी जैन धर्मीयांच्या कुटुंबातील महिलांनी आपल्या घरासमोरील अंगणात आकर्षक रांगोळीचा सडा शिंपला होता. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन महावीर जयंती मोठ्या स्वरूपात साजरी न करता घरी राहूनच साजरी करावी, या प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मंदिर परिसरात सर्वांनी जाणे टाळले. घरीच प्रतिमेचे पूजन करीत जयंती साजरी करण्यात आली.

Web Title: Mahavir Jayanti is celebrated in a simple way at home