शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला

By दीपक शिंदे | Updated: October 18, 2024 18:55 IST

मुख्यमंत्री नव्हे मी स्वत:ला कॉमन मॅन समजतो

सातारा : महाविकास आघाडीमध्येमुख्यमंत्री कोण होणार यावरुन वादविवाद सुरु आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्याचा उमेदवार ठरविण्यापेक्षा विरोधीपक्षनेतेपदाचा उमेदवार ठरविणे गरजेचे आहे. आघाडीतील नेत्यांच्या तंगड्यात त्यांच्याच गळ्यात अडकणार आहेत असा टोला मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी लगावला.

तर महायुतीत कोणतीही स्पर्धा नाही आणि मी तर स्वत:ला मुख्यमंत्री न मानता सर्वांना उपलब्ध असलेला कॉमन मॅन समजतो असे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या आपल्या गावी अचानक आले होते. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. गेल्या दोन सव्वा दोन वर्षात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे झाली आहेत. याची पोच पावती जनता मतपेटीतून दिल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान राज्यात कुठेही बंडखोरी होणार नाही महायुती समन्वयाने लढेल असेही शिंदे यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीने केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्रातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही. कारण जेवढे काम केले, जेवढे प्रकल्प पुढे नेले, जेवढ्या कल्याणकारी योजना राबवल्या. कोण उभे राहते हे महत्त्वाचे नाही तर शेवटी जिंकणं महत्त्वाचं आहे, कोणाला किती जागा द्यायच्या व कुठे कोणते उमेदवार द्यायचे हे आज दोन दिवसात ठरेल. महायुतीमध्ये कोणताही वाद नाही.महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे. ती विचार सोडलेली आघाडी आहे. बाळासाहेबांचे विचार त्यागलेली आघाडी आहे. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी झालेल्या आघाडीत लवकरच बिघाडी होईल असे मतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे परत दरे गावीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी एकदिवसीय दौऱ्यावर आले होते. दरम्यान ते आपल्या हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होत असताना खराब हवामानामुळे व प्रचंड पाऊस पडत असल्याने हेलिकॉप्टर पुन्हा दरेगावी उतरविण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी