शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाकडून 'महाराष्ट्र क्रांती सेना' पक्षाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 14:07 IST

मराठा समाजाकडून महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

सातारा - मराठा समाजाकडून महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी या पक्षाची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा मोर्चा आणि मराठा संघटनांचा विरोध डावलून सुरेश पाटील यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.  

पक्ष स्थापनेच्या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, मराठा मोर्चानं पक्षाचं नाव मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा असं ठेवण्यास विरोध केला. या नावांमध्ये मराठा समाजाची अस्मिता दडली आहे. त्यामुळे पक्षाचं नाव महाराष्ट्र क्रांती सेना ठेवले, अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिली. 

(‘मराठा आरक्षणासाठी दिवाळीनंतर क्रांती मोर्चा होणार आक्रमक’)

 

मराठा क्रांती मोर्चा’ नावाने पक्ष स्थापनेला नाशिकमधून विरोध

दरम्यान, पक्ष स्थापनेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध असल्याची भूमिका नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर व तुषार जगताप यांनी सोमवारी स्पष्ट केली होती. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट आरक्षण प्राप्त करणे आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मराठा संघटनांच्या पक्ष स्थापनेशी संबंध नाही. नाशिकसोबतच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव येथील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचाही पक्ष स्थापनेला विरोध असल्याचे सांगतानाच मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने पक्षाची निर्मिती करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचेही समन्वयकांनी सांगितले होते.  

गेल्या आठवड्यात नवीन मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा नावाने पक्ष अथवा संघटनांची स्थापना करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून, अशा प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी त्यांना कडाडून विरोध करण्याची भूमिका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.

कोणीही नेता नाहीमराठा क्रांती मोर्चात कोणीही नेता, मार्गदर्शक, पाठीराखा अथवा रसद पुरविणारा व्यक्ती नाही, हे मोर्चाचे ठळक वैशिष्ट्य आहे.‘ एक मराठा, लाख मराठा’ हे घोषवाक्य घेऊन मराठा समाज आपसातील मतभेद, पक्ष, संघटना विसरून एकवटला होता. ही एकजूट अशीच पुढेही कायम राहावी यासाठी मराठा समाजाचा कोणताही विशिष्ट पक्ष, संघटना अथवा नेता असणार नसल्याचेही नाशिकच्या समन्वयकांनी स्पष्ट केले होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणmaratha mahasanghमराठा महासंघ