सातारा : राज्यातील हाय व्होल्टेज जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सातारा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांतील निकाल विलंबाने लागणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनीच दिली आहे.
साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देवून भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र, विधानसभेची निवडणूक जाहीर केली तरीही लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली नसल्याने उदयनराजेंची धाकधूक वाढली होती. अशातच दोन दिवसांनी जीआर काढून लोकसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. आता निकालालाही विलंब लागणार असल्याने उदयनराजेंना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणि भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला होता. तसेच भाजपाचे मावळते अध्यक्ष अमित शहा यांनीही सभा घेतली होती. यामुळे साताऱ्याचे राजघराणे निवडणुकीत असल्याने राज्यभरात हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा मानला जात आहे.