शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : शरद पवार 'बडे खिलाडी'; हवेची दिशा त्यांना कळलीय; मोदींचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 16:58 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट आहे. जे लोक साताऱ्याला बालेकिल्ला समजत होते, ते लोकही लढायची आता हिंमत करत नाही.

साताराः काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट आहे. जे लोक साताऱ्याला बालेकिल्ला समजत होते, ते लोकही लढायची आता हिंमत करत नाही. राष्ट्रवादीनं पृथ्वीराज चव्हाणांना उतरवण्याचा प्रयत्न केला, पण तेसुद्धा लढायला तयार नाहीत. शरद पवार हे शरद पवार आहेत, ते हवेची दिशा बरोबर ओळखतात, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत, ते साताऱ्यातील सभेत बोलत होते. पुढे ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शहिदांवर जेव्हा प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा सर्वात जास्त दुःख साताऱ्यातील भूमीला होतं. सावरकरांना हे लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा साताऱ्याचा राग अनावर होतो. काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहे, तर शिवसेना-भाजपा महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. साताऱ्यात महामार्गाचे अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. नाही तर पहिल्यांदा विकासाच्या नावावर कशा पद्धतीचं राजकारण व्हायचं हे तुम्हाला माहीतच असेल. 90च्या दशकात महायुतीचं सरकार होतं, तेव्हा काही धरणांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. त्यानंतर महायुतीचं सरकार गेलं आणि त्या फायली अडगळीत गेल्या. परंतु आमच्या सरकारनं पुन्हा त्या फायली खोलल्या आणि साताऱ्याचा विकास केला. शेतकऱ्यांचा विचार महायुतीच्या सरकारनंच केला आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.  

गेल्या पाच वर्षांत महायुतीच्या सरकारनं शिवाजी महाराजांच्या संस्कारांनी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रसंरक्षण आणि राष्ट्रवादाला आम्ही प्राथमिकता दिली आहे. भारत भूमीवर वाईट नजर ठेवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल. शिवाजी महाराजांनी त्या काळातही सशक्त नव्या सेनेचं निर्माण केलं होतं. गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारनं भारतीय सेनेला जगातील ताकदवान सेनेच्या पंक्तीत आणून बसवलं आहे. भारताकडे अनेक अस्त्र आणि शस्त्रे आहेत. महायुतीच्या सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जे आमच्या विरोधात उभे आहेत, त्यांनी राष्ट्ररक्षेसाठी आम्ही उचललेल्या पावलांचा विरोध केला, असं म्हणत मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवरही टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019satara-acसाताराSharad Pawarशरद पवारAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019