शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget 2024: सातारच्या पर्यटनासाठी ३८१ कोटी, कऱ्हाडला युवक कौशल्य प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 11:55 IST

सातारा : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दुपारी अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये अजित पवार ...

सातारा : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दुपारी अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आणि ४३० खाटांचे रुग्णालय, कराड येथे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये युवक कौशल्य प्रकल्प, पश्चिम घाटाच्या पर्यटनासाठी ३८१ कोटी रुपयांचा एकात्मिक विकास आराखडा असे महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याने याकडे सातारा जिल्ह्यासाठी कोणती तरतूद करण्यात येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. यानुसार राज्यात सध्या या १ लाख लोकसंख्येमागे ८४ डॉक्टर आहेत. २०३५ पर्यंत ही संख्या १०० च्या वर नेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी १०० प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यात ४३० खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यात साताराचाही समावेश करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी ३८१.५६ कोटी रुपये एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत श्रीक्षेत्र महाबळेश्वर विकास, प्रतापगड किल्ला जतन व सवंर्धन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन, कोयना व हेळवाक वनक्षेत्र अंतर्गत जलपर्यटनाचा समावेश आहे.ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पानंतर ५०० औद्योगिक संस्थांची दर्जा वाढ, मॉडेल, आयटीआय, जागतिक कौशल्यकेंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे नागपूरसह सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स मान्यता देण्यात आली.स्थानिकांना रोजगाराची संधीसातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यानुसार श्रीक्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन, सह्याद्री व्याघ्र राखीव व वनक्षेत्रातील पर्यटन विकास व कोयना हेळवाक वन विभागांतर्गत कोयना नदी जलपर्यटन विकासाची कामे करण्यात येणार आहेत. मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यात येणार असून नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्ट्स असणारा हा पहिला प्रकल्प ठरणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरvidhan sabhaविधानसभाAjit Pawarअजित पवारtourismपर्यटन