शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : साताऱ्यात कडकडीत बंद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 14:01 IST

मराठा समन्वय समितीच्या वतीने क्रांतिदिनी राज्यव्यापी बंद पुकारल्याने गुरुवारी सकाळपासून साताऱ्यांत सर्वत्र कडकडीत बंद पुकारण्यात आला. त्यामुळे शहरात शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान, मराठा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साताऱ्यात कडकडीत बंद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात

सातारा : मराठा समन्वय समितीच्या वतीने क्रांतिदिनी राज्यव्यापी बंद पुकारल्याने गुरुवारी सकाळपासून साताऱ्यांत सर्वत्र कडकडीत बंद पुकारण्यात आला. त्यामुळे शहरात शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान, मराठा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २५ जुलै रोजी झालेल्या मोर्चानंतर महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. तसेच जमावाने पोलिसांवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली होती. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी शहरासह जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवला होता. गुरुवारी सकाळपासून एकही दुकान न उघडल्याने सर्व बाजारपेठ बंद होती.बाजार समितीच्या आवारात भाजी मंडईमध्ये सकाळी काही शेतकरी भाजीपाला घेऊन आले होते. मात्र, ग्राहक नसल्याने अनेकांना आपला शेतमाल फेकून द्यावा लागला. एसटी प्रशासनाच्या वतीने सर्व बसच्या फेऱ्या रद्द केल्याने बसस्थानकाच्या परिसरात शांतता पसरली होती. तसेच सर्व शाळा व महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थीही फिरकले नाहीत.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. शहर तसेच ग्रामीण भागातून अनेकजण या आंदोलनात सहभागी होत आहेत.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSatara areaसातारा परिसर