शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

माण-खटाव मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावरून वाद; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 19:56 IST

वडूज : माण -खटाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता उमेदवार सत्यवान विजय ओंबासे (रा. वडगाव ता. ...

वडूज : माण-खटाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता उमेदवार सत्यवान विजय ओंबासे (रा. वडगाव ता. माण) यांनी मतदारांवर गैरवाजवी प्रभाव पाडण्यासाठी डिजिटल फ्लेक्सवर ट्रम्पेट या चिन्हाच्या समोर कंसात तुतारी असे लिहून आणि स्पीकरवर ऑडिओ क्लिप प्रसारित केल्याने सदरच्या गाडीवर व उमेदवारावर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, माण-खटाव मतदारसंघात स्वराज्य सेनेचे उमेदवार सत्यवान ओंबासे यांना निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट हे अधिकृत चिन्ह मिळाले आहे. मात्र, प्रचार करत असताना ट्रम्पेट कंसात तुतारी असा प्रचार करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, तालुकाध्यक्ष दत्तुकाका घार्गे, सरचिटणीस सूर्यभान जाधव व कार्यकर्ते यांनी सदर प्रचाराची गाडी मांडवे हद्दीत पकडून वडूज पोलिस ठाण्यात आणली. संबंधितांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याच संदर्भात वडूज पोलिस ठाण्यात उमेदवार सत्यवान ओंबासे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच वाहन क्रमांक ११ डीबी ५६१० वरदेखील गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाल्या असून वाहनावरील आक्षेपार्ह साहित्य आणि स्पीकर जप्त केले आहे. तर सदर उमेदवारावर आचारसंहितेचा भंग म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रसाद वाघ करीत आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४man-acमाणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024