शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

प्रतिपंढरपूर करहरमध्ये शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 18:41 IST

दिलीप पाडळे  पाचगणी : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिपंढरपूर करहर ता.जावळी येथे विठुरायाची महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार ...

दिलीप पाडळे पाचगणी : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिपंढरपूर करहर ता.जावळी येथे विठुरायाची महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. सातारा जावळीचे भाजपाचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते तसेच जावळीचे माजी आमदार शशिकांत शिंदे व माजी शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा संपन्न झाली.महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच आषाढी एकादशी! या उत्सवानिमित्त दरवर्षी प्रतीपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या करहर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आजची महापूजा भक्तीभावाने संपन्न झाली. सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी महापूजा पार पडली. यावेळी गावातील तीन वारकरी दाम्पंत्यांनाही विठुरायाच्या पुजेचा मान देण्यात आला. यावेळी तहदिलदार हणमंत कोळेकर, नायब तहसीलदार संजय बैलकर, जावळी - महाबळेश्वर बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, मेढा पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, करहरच्या सरपंच सोनाली यादव, उपसरपंच प्रदीप झंडेंसह ग्रामस्थ उपस्थित होते.धार्मिक पूजेनंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची रांग लागली. दुपार नंतर काटवली, बेलोशी, दापवडी या दिशेने पालख्या येत असतात. त्याच वेळी कुडाळ, सोमर्डी, बामणोली, शेते, करंदी, येथून सुद्धा पालख्या आणि पारंपरिक वेशभूषा केलेल्या दिंड्या येतात. बस स्थानकावर हे वारकरी दिंड्या एकत्र आल्याने विठ्ठल नामाचा जयघोष करीत रिंगण सोहळ्यास भाविकांनी गर्दी केली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी