महाडिक यांच्या वीर मातेस पाच लाखांची मदत

By Admin | Updated: April 10, 2016 00:09 IST2016-04-10T00:06:09+5:302016-04-10T00:09:41+5:30

महाराष्ट्र शासनाकडून प्रदान

Mahadik's Veer Mateus gets five lakhs help | महाडिक यांच्या वीर मातेस पाच लाखांची मदत

महाडिक यांच्या वीर मातेस पाच लाखांची मदत

सातारा : येथील सैनिक स्कूलमध्ये शनिवारी झालेल्या डिफेन्स पेन्शन अदालतीत शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीर मातेस महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदतीचा पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. त्याचबरोबर अंबवडे वाघोली येथील सेवारत सैनिक शिपाई अमर साबळे यांनाही ‘मेन्शन इन डिस्पॅच’ पदक मिळाल्याबद्दल अडीच लाखांचा धनादेश देण्यात आला.
या पेन्शन अदालतमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांचे अवलंबिताकडून प्राप्त झालेल्या ७३५ तक्रारी अर्जांपैकी २५८ अर्जांचे निराकरण करण्यात आले. उर्वरीत तक्रारींचे निराकरण लवकरच करण्याची ग्वाही अ‍ॅडीशनल सी. डी. ए. निरंजन कुमार यांनी दिली. यावेळी पेन्शन ई-सुविधाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पेन्शन विषयक तक्रारींबाबत टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
रक्षा लेखा प्रधान नियंत्रक व रक्षा लेखा महानियंत्रक, रक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार पी.सी. डी. ए. (पेन्शन) अलाहाबाद यांच्यामार्फत १३९ व्या पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वन रँक वन पेन्शनचा फरक अदा करणे सुलभ होण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोषागार कार्यालयातून पेन्शन घेत असलेल्या आहेत, अशा सर्व माजी सैनिक व माजी सैनिक विधवांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सैन्य सेवेतील सर्व कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर.जाधव यांनी केले.
या पेन्शन अदालतीस ब्रिगेडीयर पी. एस. नायर, डिफेन्स पेन्शन अदालत आॅफिसर आशिष सेन, सातारा सैनिक स्कूलचे प्राचार्य, सी.पी.पी.सी., एसबीआय., सी.बी.आय., बेलापूर यांचे प्रतिनिधी, कर्नल राणा, एस. एस. ओ. स्टेशन हेडक्वार्टर्स, कोल्हापूर, अभिलेख कार्यालय, बीईजी., ई.एम.ई., मराठा लाईट इन्फंट्री, आर्मड कोर, महार रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट व ए.एस.सी. यांचे प्रतिनिधी, पी.सी.डी.ए. व बी.ई.जी. सेंटर यांचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Mahadik's Veer Mateus gets five lakhs help