शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरला पर्यटक पाऊस सरीच्या प्रेमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 13:06 IST

महाबळेश्वरमध्ये मान्सून सक्रीय झाला असून शहर व परिसरात सरी वर सरी कोसळत आहेत. त्यातच शहरात जून हंगामामध्ये हौसी पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी एका हातात गरमा गरम कणीस तर कोणी थंड आईस्क्रीम, बर्फाचा कलरफुल फेमस गोळा गडद धुक्यात व पावसात खाताना दिसून येत आहेत. तसेच फॅमिलीचा सेल्फी फोटोही काढण्यात अनेकजण दंग होत आहेत. एकूणच महाबळेश्वरमध्ये पावसाचा आनंद घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देमहाबळेश्वरला पर्यटक पाऊस सरीच्या प्रेमात !भिजण्याचा आनंद : पावसात गरमा गरम कणसाचा आस्वाद

महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये मान्सून सक्रीय झाला असून शहर व परिसरात सरी वर सरी कोसळत आहेत. त्यातच शहरात जून हंगामामध्ये हौसी पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत.

पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी एका हातात गरमा गरम कणीस तर कोणी थंड आईस्क्रीम, बर्फाचा कलरफुल फेमस गोळा गडद धुक्यात व पावसात खाताना दिसून येत आहेत. तसेच फॅमिलीचा सेल्फी फोटोही काढण्यात अनेकजण दंग होत आहेत. एकूणच महाबळेश्वरमध्ये पावसाचा आनंद घेण्यात येत आहे.पावसाचे माहेरघर महाबळेश्वर हे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचे नंदनवन, थंड हवेचे ठिकाण असणारे महाबळेश्वर पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असल्याने पर्यटक या शहराच्या प्रेमात पडतात. आता उन्हाळी हंगाम संपताच महाबळेश्वरकरांसह पर्यटकांना वेध लागले आहेत ते येथील पावसाचे. कारण येथे धुवाँधार पाऊस पडतो.

जून, जुलै आणि आॅगस्ट या महिन्यांमध्ये तर महाबळेश्वरमध्ये सूर्यदर्शनच होत नाही. आता या नगरीचे स्वरूप हंगामी राहिले नसून बारमाही झाले आहे. कारण येथे येणारे पर्यटक आता पावसाळ्यामध्ये देखील निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येतात.

पावसाळ्यातील महाबळेश्वर म्हणजे अप्रतिम निसर्गसौंदर्य, आल्हाददायक वातावरण, जोडीला धुके व मुसळधार पावसाची साथ, डोंगररांगांमधून अविरत वाहणारे धबधबे अशा वातावरणामध्ये पर्यटक गुंग होऊन जातात. सध्या पावसाळा अनुभवण्यासाठी येथे पर्यटक आले आहेत.

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानRainपाऊसmonsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर