शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर : धुके अन् पावसाचा आधार घेऊन फोडल्या तीन पतसंस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 15:13 IST

धुके अन् पावसाचा आधार घेऊन शहरातील तीन पतसंस्थांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरीची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे महाबळेश्वर शहरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देधुके अन् पावसाचा आधार घेऊन फोडल्या तीन पतसंस्थामहाबळेश्वरात चोरी; चार लाखांची रोकड लंपास, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

महाबळेश्वर : धुके अन् पावसाचा आधार घेऊन शहरातील तीन पतसंस्थांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरीची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे महाबळेश्वर शहरात खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर येथील महात्मा फुले भाजी मंडईजवळ जनता नागरी सहकारी पतसंस्था, गोटेनीरा जननी माता बिगरशेती सहकारी व साई नागरी सहकारी या तीन पतसंस्थांची कार्यालये आहेत. शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे कामकाज संपल्यानंतर कर्मचारी पतसंस्था बंद करून घरी निघून गेले.

दरम्यान, मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मोठ्या शिताफीने एकापाठोपाठ एक या तिन्ही पतसंस्थांचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी जनता नागरी सहकारी पतसंस्था व गोटेनीरा जननीमाता बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली रोकड लंपास केली. साई नागरी पतसंस्थेत मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या पतसंस्थेत अत्यावश्यक कागदपत्रे इतरत्र पसरली होती.शनिवारी सकाळी चोरीच्या घटना उघडकीस येताच नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांच्या माध्यमातून चोरट्यांचा तपास केला. मात्र पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागला नाही.

दरम्यान, पतसंस्थेच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे बंदिस्त झाले आहेत.  तोंडाला रुमाल बांधून तसेच हातामध्ये बॅटरी व एक्साब्लेड घेऊन पतसंस्थांना लावलेले कुलूप फोडल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. एका रात्रीत तीन पतसंस्थांमध्ये चोरी झाल्याने महाबळेश्वरसह परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाSatara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान