महाबळेश्वर तालुका लसीकरणात अग्रेसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST2021-06-05T04:27:38+5:302021-06-05T04:27:38+5:30

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात लसीकरण मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत तालुक्याच्या लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिले तर २८,६८७ लोकांचे लसीकरण झाले असून, त्याची टक्केवारी ...

Mahabaleshwar taluka a leader in vaccination! | महाबळेश्वर तालुका लसीकरणात अग्रेसर!

महाबळेश्वर तालुका लसीकरणात अग्रेसर!

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात लसीकरण मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत तालुक्याच्या लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिले तर २८,६८७ लोकांचे लसीकरण झाले असून, त्याची टक्केवारी ५४.८८ झाली तर तालुक्यात निम्यापेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे.

तालुक्यात प्रामुख्याने कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्यसेविका एकूण १३४३ पैकी पहिला डोस ७३७ तर दुसरा डोस ६०६ घेतला आहे. फ्रंटलाईन वर्कर एकूण २,८८६ यामध्ये पहिला डोस १९२६ दुसरा डोस ९६०, १८ ते ४४ वर्षे वयोगट एकूण २,११२ यामध्ये पहिला डोस, दुसरा डोस शून्य, ४५ ते ५९ वयोमर्यादा एकूण ११,४४९, पहिला डोस ९,६२७ तर दुसरा डोस १८२२, तर ६० जास्त वयाच्या व्यक्ती एकूण १०, ७९७. पहिला डोस ८,०३२ दुसरा तर डोस २,७६५ असे लसीकरण झाले आहे.

तालुक्याची लोकसंख्या ५२,०८६ यामध्ये आजपर्यंत झालेले लसीकरण २८, ५८७ याची टक्केवारी ५४.८८ टक्के असून, एवढे लसीकरण तालुक्यात झाले असून, आरोग्य विभागाने नियोजनबद्ध केलेल्या कामाचे हे फलित आहे. त्याकरिता तालुका आरोग्य अधिकारी अजित कदम यांनी तालुकास्तरावर आपल्या कर्मचाऱ्यांच्या सोबत राबविलेल्या मोहिमेचे यश आहे. त्यामुळेच आज तालुका जिल्ह्यात लसीकरणामध्ये अग्रेसर राहिला आहे.

चौकट : तालुक्यात आत्तापर्यंत २८.५८७ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये पहिला डोस २२,४३४, तर दुसरा डोस ६१५३ लोकांना देण्यात आला आहे. यामध्ये कोविशिल्ड २५,५०८, डोस तर कोव्हॅक्सिन ३०७९ डोसचे लसीकरण झाले आहे.

(कोट)

महाबळेश्वर तालुक्यात चार आरोग्य केंद्रांतर्गत यामध्ये पाचगणी, महाबळेश्वर, तळदेव, तापोळा यामध्ये नियमित तर १२ उपकेंद्रांतर्गत आठवड्यातून एकदा लसीकरण मोहीम राबविण्यात येतेय. सर्व सहकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ५५ टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठले तर ४५ वर्षांवरील नागरिकांचे तालुक्यातील ९० टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे. यामध्ये सहकारी कोविड योद्धे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

-अजित कदम, तालुका वैद्यकीय अधिकारी, महाबळेश्वर

Web Title: Mahabaleshwar taluka a leader in vaccination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.