महाबळेश्वर तालुका काँग्रेसला नवीन कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:48+5:302021-09-13T04:38:48+5:30

सातारा : राष्ट्रीय काँग्रेसची महाबळेश्वर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी नंदकुमार बावळेकर यांची नियुक्ती झाली आहे, तर ...

Mahabaleshwar taluka Congress new caretaker | महाबळेश्वर तालुका काँग्रेसला नवीन कारभारी

महाबळेश्वर तालुका काँग्रेसला नवीन कारभारी

सातारा : राष्ट्रीय काँग्रेसची महाबळेश्वर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी नंदकुमार बावळेकर यांची नियुक्ती झाली आहे, तर चौघांकडे उपाध्यक्ष आणि सहाजणांकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी महाबळेश्वर तालुक्याची कार्यकारिणी जाहीर केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने नवीन निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. या कार्यकारिणीत एकूण २२ जण आहेत. उपाध्यक्ष चार असून, सहा सरचिटणीस, तर सातजणांकडे चिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महाबळेश्वर तालुक्याचे अध्यक्षपद नंदकुमार बावळेकर यांच्याकडे असून, उपाध्यक्ष म्हणून शरद चौधरी, मोहम्मद खारकंडे, मनाजी धनवडे, भीमराव साळवी (कुंभार) यांची नियुक्ती झाली आहे, तर युनूस डांगे हे खजिनदार असतील. सरचिटणीसपदी रमेश जाधव, रमेश कदम, अनिल जाधव, सुधीर जंगम, मोहम्मद नालबंद आणि नसीम आतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर चिटणीसपदावर राजेंद्र जांभळे, सलीम शेख, राकेश देवकुळे, मोहन कारंडे, रामचंद्र सपकाळ, तुकाराम मोरे आणि रामदास सपकाळ यांची नियुक्ती झाली आहे. तसेच सदस्य म्हणून प्रताप दाभेकर, सखाराम सपकाळ आणि बबन उत्तेकर या तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे.

.........................................................

Web Title: Mahabaleshwar taluka Congress new caretaker