शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरचा पाऊस साडेचार हजारी, कोयना धरणातील पाणीसाठा अजून वाढेना 

By नितीन काळेल | Updated: August 23, 2023 12:19 IST

कोयनेला गतवर्षीपेक्षा कमी पाऊस

सातारा : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असलेतरी महाबळेश्वरच्या पर्जन्यमानाने यावर्षीचा साडे चार हजार मिलीमीटरचा टप्पा गाठला आहे. तर कोयनेला गतवर्षीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही वाढेना अशी स्थिती आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात ८४.७० टीएमसी पाणीसाठा झाला होता.जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला. पश्चिम भागात मागीलवर्षीच्या तुलनेत अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली. मात्र, मागील २० दिवसांपासून पश्चिमेकडे अत्यल्प पाऊस पडत आहे. तसेच पूर्व भागात पावसाची दडी कायम आहे. यामुळे चिंता वाढलेली आहे. सध्यस्थितीचा विचार करता यंदा कोयनानगर आणि महाबळेश्वरला गतवर्षीपेक्षा पाऊस कमी झालेला आहे. तर नवजाला अधिक पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पश्चिम भागात अत्यल्प पाऊस पडला. कोयनानगर येथे ८ आणि नवजाला ५ मिलीमीटरची नोंद झाली. तर महाबळेश्वरला १० मिलीमीटर पाऊस पडला आहे. एक जूनपासूनचा विचार करता कोयनानगरला ३३६४ तर नवाजाला ४८०० आणि महाबळेश्वर येथे ४५०० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. त्याचबरोबर पाऊस नसल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे. सकाळच्या सुमारास १३३३ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा ८४.७० टीएमसी झालेला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानKoyana Damकोयना धरण