शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर @ १३, महाराष्ट्राचे नंदनवन थंडीने गारठले, वेण्णा तलाव परिसराचे तापमान आणखीन ५ अंशांनी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 12:27 IST

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन असलेले महाबळेश्वर थंडीने गारठले . येथील थंडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढू लागली आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार बुधवारी १३.६ व गुरुवारी येथील किमान तापमान १३.४ तर शुक्रवारी पहाटे १३.३ अंश सेल्सिअस होते. वेण्णा तलाव परिसरात ते आणखीन ४ ते ५ अंशांनी तापमानाने कमी होते.हुडहुडी भरणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी स्थनिकांसह ...

ठळक मुद्देमहाबळेश्वर थंडीने गारठले, थंडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढू वेण्णा तलाव परिसरात आणखीन तापमान ४ ते ५ अंशांनी कमीघरावरील पत्रे असो वा झाडे झुडपे, सारे दवबिंदूंनी ओले चिंब

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन असलेले महाबळेश्वर थंडीने गारठले. येथील थंडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढू लागली आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार बुधवारी १३.६ व गुरुवारी येथील किमान तापमान १३.४ तर शुक्रवारी पहाटे १३.३ अंश सेल्सिअस होते. वेण्णा तलाव परिसरात ते आणखीन ४ ते ५ अंशांनी तापमानाने कमी होते.हुडहुडी भरणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी स्थनिकांसह येथे फिरायला आलेले पर्यटक उबदार कपडे परिधान करत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून येथे थंडी जाणवत असून तिची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. वाढत्या थंडीमुळे दोन दिवस हे गिरीशिखर दवबिंदूंनी अक्षरश: न्हाऊन निघाले होते. घरावरील पत्रे असो वा झाडे झुडपे सारे दवबिंदूंनी ओले चिंब झाले.

वेण्णा तलाव परिसरही त्यास अपवाद नव्हता. तापमान आणखीन खाली आल्याने वेण्णा तलावावरील पाण्यावर थंडीच्या वाफा भल्या पहाटेपासून पाहावयास मिळत होत्या. त्यामुळे वेण्णा तलाव परिसर गार तर होताच; परंतु तलावाच्या पाण्यावर थंड वातावरणामुळे वाफा जमा झाल्याने परिसर पांढरा झाल्याचे दिसत होते.

या थंडीतही काही हौसी पर्यटक फिरणारे मनमुराद आनंद लुटताना पाहावयास मिळत होते. मागील आठवड्यात ओखी वादळामुळे येथील हवा थंडतर होतीच; पण ते पावसाळीच बनले होते. त्यानंतर तापमानात थोडी वाढ झाली होती. आत्ता पुन्हा येथील थंडीचा जोर वाढू लागला आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार रविवारी येथील किमान तापमान १५.४, सोमवारी १४.६ , मंगळवारी १४.६, बुधवार येथील किमान तापमान १३.६ तर गुरुवारी ते १३.४ होते. 

 

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानtourismपर्यटन