जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे साताऱ्यात प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:13 IST2021-02-18T05:13:09+5:302021-02-18T05:13:09+5:30
सातारा : प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर हे लॉकडाऊननंतर आता संपूर्ण कुटुंबासाठी नवीन जादूचे प्रयोग सादर करणार आहेत. साताऱ्यातील शाहू ...

जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे साताऱ्यात प्रयोग
सातारा : प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर हे लॉकडाऊननंतर आता संपूर्ण कुटुंबासाठी नवीन जादूचे प्रयोग सादर करणार आहेत. साताऱ्यातील शाहू कला मंदिरात रविवार, दि. २१ रोजी सायंकाळी सात वाजता जादूचा प्रयोग होणार आहे. त्यामुळे सातारकरांची अकरा महिन्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अल्टरनेट सिटिंग, सॅनिटायझेशन, ऑक्सिजन आणि टेम्परेचर चेकिंग, आदी स्वरूपातील आवश्यक ती दक्षता घेऊन हे प्रयोग होतील. अडीच तासांच्या या प्रयोगामध्ये सुमधुर संगीत, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, इजिप्शियन, अमेरिकन, जायनीज, अरेबिक जादूचे चित्तथरारक प्रयोग पाहता येणार आहेत. साताऱ्यातील या प्रयोगादरम्यान काही कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या प्रयोगासाठी ऑनलाईन तिकीट नोंदणी सुरू आहे. या प्रयोगाचा प्रेक्षकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जितेंद्र रघुवीर आणि संयोजक मारुती गायकवाड, विकास पावसकर यांनी केले आहे.
फोटो १७जादूगार रघुवीर