शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

माढ्याचा तिढा सुटणार; धैर्यशील मोहिते तुतारी हाती घेणार! लवकरच राष्ट्रवादी प्रवेश

By नितीन काळेल | Updated: April 11, 2024 21:56 IST

उमेदवारीही मिळणार; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी सामना

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचा माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटत असून, धैर्यशील मोहिते-पाटील हे तुतारी हाती घेणार आहेत. लवकरच त्यांचा पक्षप्रवेशही होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा दहावा उमेदवार निश्चित होण्याचे संकेत असून, माढ्यात धैर्यशील आणि भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच सामना होणार आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वाट्याला राज्यातील १० लोकसभा मतदारसंघ आले आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत तिढा होता. अनेक चर्चेनंतर साताऱ्यात राष्ट्रवादीने माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे साताऱ्याचा तिढा सुटला. आता राष्ट्रवादीच्या १० व्या उमेदवाराचाही शोध जवळपास संपला आहे. माढ्यातून धैर्यशील मोहिते-पाटील हे तुतारी हाती घेणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

माढ्यातून भाजपने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर महायुतीतील नेते नाराज झाले. यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे रामराजे नाईक-निंबाळकर आणि भाजपमधील अकलूजचे मोहिते-पाटील यांचा समावेश आहे. या दोन्ही कुटुंबांनी निवडणूक लढवायचीच याचा चंग बांधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे जाऊन तुतारी हाती घेण्याचाही विचार झाला. यासाठी पहिल्यापासून धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नाव आघाडीवर होते. तसेच, धैर्यशील यांच्या पवार यांच्याबरोबर भेटीही झाल्या होत्या. त्यामुळे ते भाजपला सोडणार असेच चित्र होते. त्याप्रमाणेच सध्या पावले पडत आहेत.

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गुरुवारी पुण्यात शरद पवार यांची पुन्हा भेट घेतली. तेव्हाच स्पष्ट झाले की धैर्यशील हेच माढ्याचे उमेदवार राहणार. पण, त्यांनी अजून भाजपचा राजीनामा दिला नसलातरी येत्या दोन दिवसांत बऱ्याच राजकीय घडामोडी होणार आहेत. त्यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीकडून माढ्याची उमेदवारी ही धैर्यशील मोहिते यांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.  पुढील आठवड्यात सोमवारनंतर केव्हाही माढ्यासाठी राष्ट्रवादीकडून ते अर्ज भरू शकतात अशी माहितीही मिळत आहे.

वेट अँड वाॅच अन् मोहितेंना लागला गळ...माढा मतदारसंघातील उमेदवारीचा विषय यावेळी मोठा चर्चेला आलेला आहे. महायुतीतील भाजपकडून खासदार रणजितसिंह यांना उमेदवारी मिळाली. विरोधामुळे त्यांची उमेदवारी चर्चेत आली. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचा उमेदवार ठरत नव्हता. त्यामुळेही चर्चा सुरू झाली. कारण, पक्षाकडे एकही प्रबळ उमेदवार नव्हता. यासाठी शरद पवार हे गळ टाकून होते. अकलूजचे मोहिते-पाटील भाजपमध्ये नाराज होते. त्यामुळे ते गळाला लागणार असा त्यांना अंदाज असावा. त्यामुळेच त्यांनी घाईने कोणतेही पाऊल उचलले नाही. काहीजणांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. पण, त्यांनाही आधी मोहिते-पाटील यांचे काय होते ते पाहू असे सांगण्यात आले. त्यामुळे पूर्वीपासूनच राष्ट्रवादी व शरद पवार यांचा मोहिते-पाटील यांच्याकडेच कल होता. आता धैर्यशील यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाल्यानंतर उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :satara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार