मदनराव मोहितेंचा टोला : अदृश्यबाबा आता गावोगावी दिसू लागलेत; इंद्रजित मोहितेंचाही

By Admin | Updated: April 3, 2015 00:44 IST2015-04-02T23:11:48+5:302015-04-03T00:44:56+5:30

मदनराव मोहितेंचा टोला : अदृश्यबाबा आता गावोगावी दिसू लागलेत; इंद्रजित मोहितेंचाही घणाघात

Madanrao Mohiten's talent: Adiwasaba now appears in the village; Indrajit Mohiteen | मदनराव मोहितेंचा टोला : अदृश्यबाबा आता गावोगावी दिसू लागलेत; इंद्रजित मोहितेंचाही

मदनराव मोहितेंचा टोला : अदृश्यबाबा आता गावोगावी दिसू लागलेत; इंद्रजित मोहितेंचाही

कऱ्हाड : ‘यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना एक डॉक्टर चालवतात, तर इंजिनिअर का चालवू शकत नाही? असा सवाल करत कृष्णेची सत्ता हस्तगत केली. पण, या हुशार इंजिनिअरने ठेकेदारीप्रमाणे कारखाना चालवायला एक ‘गडी’ ठेवलाय. कृष्णेचा सभासद हा कारखान्याचा मालक असताना आज मालकापेक्षा गडीच शिरजोर झाला आहे,’ असा घणाघात माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांनी केला. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या येऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमधील मोहिते गटाचा प्रचार शुभारंभ क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व कृष्णेचे माजी संचालक प्रकाश पाटील अध्यक्षस्थानी होते. सातारा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंत जगताप, कऱ्हाड पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र बामणे, कारखान्याचे विद्यमान संचालक जयवंत सावंत, माजी संचालक हणमंतराव पाटील, दीपक पाटील, अजित थोरात, मानसिंंग पाटील, आनंद मलगुंडे, सुरेश पवार, संपतराव थोरात, अशोकराव पाटील, डॉ. अशोक वेदपाठक, राजेंद्र चव्हाण, अ‍ॅड. नरेंद्र पाटील, शिवाजी मोहिते, आदित्य मोहिते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
मदनराव मोहिते म्हणाले, ‘कृष्णेत निवडणुकीची चाहूल लागताच गेली पाच वर्षे ‘अदृश्य’ असणारे एक ‘बाबा’ आता गावोगावी फिरू लागले आहेत. ‘कृष्णा’ आपणच वाचवू शकतो, याचा साक्षात्कार त्यांना झालाय म्हणे. खरेतर ज्यांना स्वत:च्या खासगी कारखान्याकडे जायला वेळ मिळत नाही, ते हा कारखाना काय दुरुस्त करणार? ते कारखान्याचे जेव्हा अध्यक्ष होते, तेव्हा सायंकाळी सहा वाजता कारखान्यावर यायचे. आता हा ‘अदृश्यबाबा’ रात्रीचे कारखान्यावर येऊन तुमचे काय भले करणार ? असा सवाल करत त्यांनी भोसलेंनाही निशाण्यावर घेतले.
माणसाला गुरू चांगला मिळाला की, संस्था चांगली चालते. मला यशवंतराव मोहितेंसारखा चांगला गुरूमिळाला. म्हणून मी तुम्हाला दहा वर्षांचा सुवर्णकाळ देऊ शकलो; पण त्याच भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्यांनी स्वत:च्या मालकीचा ‘कृष्णा उद्योग समूह’ स्थापन केला आणि सहकारी संस्थेत राजकारणाचे बीज रोवले. १९७२ मध्ये आबासाहेब मोहिते यांचा ‘कृष्णे’च्या निवडणुकीतील अर्ज अडीच दिवस कायद्याचा कीस काढून जयवंतराव भोसलेंनीच बाद केला आणि आज त्यांचे वारस कारखान्यात राजकारण आम्ही आणले, असा आरोप करतात. आपल्याला दुसऱ्याला शहाणपण सुचविण्याचा अधिकार आहे का, हे त्यांनी अगोदर तपासून पाहावे.’
‘सहकारात खुले सभासदत्व देण्याचा महत्त्वपूर्ण पायंडा यशवंतराव मोहितेंनी कृष्णेत घालून दिला; पण १३ हजार ५२८ सभासदांच्या हक्कावर गदा घालणाऱ्या भोसलेंना आज १८ हजार थकबाकीदार सभासदांचा कळवळा येतोय, हा विपर्यास नाही का ? आम्ही सभासदत्व रद्द करणारे नव्हे, तर सभासदांना मालक बनविणारी मंडळी आहोत. लांडी, लबाडी करूनच भोसलेंनी आपल्याला दोनदा फसवले आहे. यंदा त्यांच्या लांड्या-लबाड्यांना बळी पडू नका,’ असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, ‘आम्ही जमीन गोरगरिबांना कसायला देणारी माणसे आहोत. यशवंतराव मोहितेंनी स्वत:ची १८ एकर जमीन गोरगरिबांना दान केली; पण जमिनी लाटणाऱ्यांच्या नादाला लागून आम्हाला बदनाम करण्याचे षड्यंत्र आज रचले जात आहे. मी यशवंतराव मोहितेंचा मुलगा आहे. हीच माझी मोठी श्रीमंती आहे. मला विरोधकांसारखे पैसे लाटून मोठे होण्याची गरज नाही. मी मोठाच आहे, कारण मी भाऊंचा वारसदार आहे. (प्रतिनिधी)


तोच तर
त्यांचा धंदा आहे
कृष्णा कारखान्याच्या जीवावर भोसलेंनी अनेक खासगी संस्था सुरू केल्या. आज ते त्याला कृष्णा उद्योग समूह म्हणतात; पण तो त्यांचा धंदा आहे. आता त्यांनी उगाच लोकांना सहकाराचे धडे शिकविण्यापेक्षा त्यांनी शिक्षणाचा धंदा केलेलाच बरा राहील, असा टोला मदनराव मोहितेंनी भोसलेंना लगावला.



साठवलेल्या
पैशातून चंगळ केली
आम्ही कृष्णेत साठवलेल्या पैशातून सत्ताधाऱ्यांनी सुरुवातीच्या दोन वर्षांत खूप चंगळ केली. स्वकर्तृत्व नसतानाही चांगला दर देण्याचे ढोंग केले; पण त्यांच्या या ढिसाळ कारभारामुळे आज सभासदांच्या नशिबात मंगळ आला आहे. आणि तो दूर करण्यासाठी सुज्ञ सभासदांनी एकसंध होण्याची गरज आहे.
मी डॉक्टर आहे. माणूस आजारी पडल्याशिवाय माझ्याकडे येत नाही, आणि मी त्याला बरा केल्याशिवाय सोडत नाही. त्याला कारखानाही अपवाद नाही. तुम्ही काळजी करू नका एकदा आजारी कारखाना आपल्याकडे आला की त्याला बरे करण्याची खात्री डॉ. इंद्रजित मोहितेंनी यावेळी सभासदांना दिली.

Web Title: Madanrao Mohiten's talent: Adiwasaba now appears in the village; Indrajit Mohiteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.