प्रेमीयुगलांचे अश्लील चाळे
By Admin | Updated: November 24, 2014 23:13 IST2014-11-24T21:24:35+5:302014-11-24T23:13:23+5:30
गुराखींना त्रास : कास परिसरातील हिडीस चित्र

प्रेमीयुगलांचे अश्लील चाळे
बामणोली : कास पठारावरील फुलांचा हंगाम तसेच दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर अनेक युवक-युवती दुचाकीवरून कास रोडने धावत आहेत. धूमस्टाईलने गाड्या चालविल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे अनेक कॉलेज युवक-युवती कॉलेजच्या व जादा तासाच्या नावाखाली कास परिसरात दिवसभर मौजमजा लूटत आहेत.
अनेकजण रस्त्यालगत व दुचाकीवर अश्लील चाळे करत असल्यामुळे रस्त्यालगत गुराख्यांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना रंगीत सिनेमा पाहायला मिळत आहे.
शालेय विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याच्या वयातच विद्यार्थ्यांना अश्लील दृश्ये पाहावयास मिळत आहेत. अनेकांनी प्लॉस्टिक बॉटल तसेच फूडपॅकेट रस्त्यालगत फेकल्याने पर्यावरणाची हानी होत ओह. या परिसरातील ग्रामस्थांनी व स्वयंसेवी संस्थांनी या जोडप्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस
चेकिंग नाका सुरू करण्याची मागणी केली
आहे. (वार्ताहर)
प्रेमिकांनी बनवलेत अड्डे
कास परिसरात अनैतिक बाबींना उधाण आले आहे. कास तलाव परिसरात मद्य पिऊन धिंगाणा घालायचा आणि बाटल्या फोडून त्या तलावात टाकण्याचे उद्योग रोज सुरु असतात. मद्यपान केलेले युवक पर्यटक महिलांनाही खाणाखुणा करतात. त्यातच प्रेमीयुगलांनी जागोजागी अड्डे बनविले असून कारवाईची मागणी होत आहे.