शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

कुमुदिनी तळ्याचे सौंदर्य पाहून पर्यटक खूश !

By admin | Updated: September 30, 2016 01:29 IST

कास पठार : शेकडो गाड्यांचा ताफा निसर्गाचे देणे पाहण्यासाठी सुसाट

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कास पठारावर पर्यटनासाठी राज्यासह देश-विदेशातून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली असून, आत्तापर्यंत हजारो पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली आहे. तसेच शाळा, महाविद्यालयांच्या सहली मोठ्या प्रमाणावर येत असून, पठारावरील विविध रंगी फुलांचे गालिचे असणाऱ्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची कुटुंबांसमवेत मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. दरम्यान, कास-महाबळेश्वर राजमार्गावर तीन किलोमीटर अंतरावर पांढरी शुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण होऊ लागले आहे.पठारावर पर्यटकांची सतत रेलचेल सुरू असून, ठिकठिकाणी गाईड पर्यटकांना येथील दुर्मीळ फुलांची व वनस्पती संदर्भात पर्यटकांना मार्गदर्शन करत आहेत. पठारावरील जैवविविधता पाहता कास पठाराची ख्याती जगभर पसरलेली आहे. जिल्ह्याला लाभलेले कास पठार हे निसर्गाचे वरदानच आहे. कित्येक पर्यटक येथील फुलांसमवेत आपल्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी येथील मनाला मोहिनी घालणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत. तसेच तेरडा, सोनकी, मंजिरी, मिकी माऊस, आभाळी,नभाळी टोपली, कारवी इतर दुर्मीळ फुले बहरलेली दिसून येत आहेत. (वार्ताहर)पठारावर पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांकडून कोणताही कचरा अस्ताव्यस्त पडून पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी कचरा एकत्रित गोळा करण्यासाठी कचराकुंड्या उभ्या केल्या आहेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून, स्वच्छतागृहाची देखील सोय करण्यात आली आहे.- श्रीरंग शिंदे, वनपाल, बामणोलीकास पठार म्हणजे निसर्गत: आपल्यासाठी जणू स्वर्गच आहे. येथील पर्वणीचा स्वानुभव कायमस्वरूपी स्मरणात राहणारा आहे. परंतु येथील पर्यावरणाला तसेच नाजूक फूल झाडांना कोणतीही हानी पोहोचणार नाही. याची सर्वांनी दक्षता घेऊन येथील पर्यटनस्थळाचा वारसा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.- कृतज्ञ साळुंके, पर्यटक, मंजिरी : ही वनस्पती तुळस वर्गात मोडते. सप्टेंबर महिन्यात पाणी साचते व आटते अशा ठिकाणी ही वनस्पती दिसते. त्यावर लहान पानांमधून तुरा येतो याची फुले निळसर रंगांच्या तुऱ्याप्रमाणे असतात. घरातील तुळशीच्या मंजिरा ज्याप्रमाणे दिसतात, त्याप्रमाणे याचे तुरे दिसतात म्हणून यास निळी मंजिरी सुद्धा म्हणतातकावळा : पिवळसर रंगाचे फूल, याचे फूल हसत असणाऱ्या मुलाप्रमाणे दिसते. कार्टून मिक्की माऊससारखे दिसते, यास स्मीत म्हणजे हसत-हसत येणारे ‘स्मिती’ या असेही म्हणतात. स्थानिक लोक यास कावळा म्हणतात.