तुटपुंज्या व्यवस्थेने वाहनधारक हतबल...!

By Admin | Updated: July 16, 2015 20:40 IST2015-07-16T20:40:49+5:302015-07-16T20:40:49+5:30

पार्किंगचा प्रश्न गंभीर : ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा वाहतूक शाखेचा प्रस्ताव...

A lot of the vehicle holder's handball ...! | तुटपुंज्या व्यवस्थेने वाहनधारक हतबल...!

तुटपुंज्या व्यवस्थेने वाहनधारक हतबल...!

सातारा : वाढत चाललेल्या वाहनांच्या संख्येच्या तुलनेत शहराची पार्किंग व्यवस्था कोलमडली आहे. वाहने जास्त अन् जागा कमी अशा तुटपुंज्या पार्किंग व्यवस्थेमुळे वाहनधारक फारच हतबल झाले आहेत. ही पार्किंग व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेने ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा प्रस्ताव पालिकेला दिला आहे.शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून राजवाडा व पोवई नाका या परिसराला पाहिले जाते. याठिकाणी जिल्ह्यातील नागरिक बाजारासाठी येतात. त्यामुळे येथे सतत वाहनांची वर्दळ असते. वाहने लावायला जागा नसल्याने काहीजण फूटपाथवर वाहने लावतात, तर काही मंडळी डबल पार्किंगमध्ये वाहने लावतात. त्यामुळे त्यांना अनेकवेळा वाहतूक पोलिसांच्या क्रेनचा सामना करावा लागतो. वाहतूक पोलीस व पालिकेने पार्किंगसाठी शहरात सम-विषम तारखेनुसार पार्किंग व्यवस्था केली आहे. परंतु, ज्या पार्किंग व्यवस्थेतही अनेक वाटेकरी आहेत. या पार्किंगमध्ये दुकानात जाण्या-येण्यासाठी अडगळ (लोखंडी जाळी) टाकली जाते. तर काही विक्रेते पार्किंगमध्येच दुकाने थाटतात, तर अनेक फिरते हातगाडेधारक पार्किंगच्या जागेवरच हातगाडे लावून विक्री करतात. त्यामुळे मुळात पार्किंग अपुरे आणि त्यात या वाटेकऱ्यांमुळे वाहनधारकांना पार्किंग करायला जागाही मिळत नाही. अनेकदा पार्किंगचे नियम मोडून वाहने पार्क केली जातात व दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते.बाजाराचा दिवस, गणपती, दुर्गोत्सव, दिवाळीला तर पार्किंगचा मोठा ताण पडत आहे. यामुळे वाहनधारक व वाहतूक पोलिसांत नेहमीच वाद होतो. यावर पर्याय म्हणून शहरातील प्रमुख बाजारपेठेत ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ करावे, असा प्रस्ताव वाहतूक, पालिका व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे वाहतूक निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी सांगितले.

डबल व फूटपाथ पार्किंगवाले सावधान!
पार्किंगला जागा अपुरी पडत आहे. यासाठी अनेक वाहनधारक चक्क डबल पार्किंग करतात, तर अनेकजण फूटपाथवर पार्किंग करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे. यावर योग्य ती कारवाई होत नसल्याने वाहनधारकही बिनधास्त पार्किंग करतात; परंतु आता डबल व फूटपाथवर पार्किंग करणाऱ्यावरही वाहतूक शाखा क्रेनने वाहन उचलणार आहे. त्यामुळे या वाहनधारकांनाही आता सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

आधी पार्किंग
व्यवस्था मग दंड...
शहरात वाहने लावायला जागा नाही. नो पार्किंगमध्ये वाहने उचलली जातात. त्यामुळे आधी योग्य ती पार्किंग जागा आम्हाला द्या, व नंतरच क्रेनने उचला.
- विकास धुमाळ, वाहनचालक

Web Title: A lot of the vehicle holder's handball ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.