पुसेसावळीत आंब्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:41 IST2021-05-18T04:41:57+5:302021-05-18T04:41:57+5:30
पुसेसावळी : पुसेसावळी परिसराला गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेतमालाचे नुकसान ...

पुसेसावळीत आंब्याचे नुकसान
पुसेसावळी : पुसेसावळी परिसराला गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेतमालाचे नुकसान झाले तर काही ठिकाणी आंबा फळांचेही नुकसान झाले आहे.
म्हासुर्णे (ता. खटाव) येथील वर्षा सतीश वायदांडे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले. हे घर जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे दोन खोल्यांचे पत्र्याचे घर आहे. वादळी वाऱ्यात घरावरील पत्रा उडून जाऊन दूरवर पडला. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसून, फक्त संसारोपयोगी साहित्य व धान्य भिजले आहे. या घटनेची माहिती मिळताच म्हासुर्णेचे तलाठ्यांनी नुकसानग्रस्त घराचा पंचनामा केला. लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी, अशी मागणी वायदांडे कुटुंबियांनी केली आहे.