शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पर्यटकांना लुटणारीटोळी गजाआड

By admin | Updated: July 15, 2014 01:24 IST

सातारा, शिरवळसह अनेक गुन्हे उघडकीस

सातारा : पर्यटनस्थळी फिरण्यास आलेल्या कुटुंबाला मारहाण करून ऐवज लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले. खंडाळा येथील वीर धरणाजवळ दाम्पत्याला याच टोळीने लुटल्याचे उघडकीस आले असून, आणखी बरेच गुन्हे या टोळीकडून उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी वर्तविली आहे. मुख्य सूत्रधार दिलीप गोरख माळी (वय २७), विजय वसंत चव्हाण (२९ ), लखन नाना जाधव (२५, तिघे रा. सगुणामाता नगर फलटण, ता. फलटण) आणि रिझवान महमंदईलीस खान (२७, रा. संतोषी माता मार्ग, सगुणामाता नगर, फलटण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, दि. २२ जूनला संजय गोपाळदास शहा (५३, रा. वैद्य गणपतीसमोर, पळशी रोड, शिरवळ, ता. खंडाळा) हे त्यांच्या कुटुंबासह वीर धरणाजवळ फिरण्यासाठी गेले होते. तेथे ते फोटो काढत असताना तिथे उभ्या असणाऱ्या सहाजणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, तीन मोबाईल, ओमणी कारची चावी असा एक लाख ९१ हजारांचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी अज्ञात सहाजणांविरुद्ध खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी माकणीकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके स्थापन केली होती. शिरवळ येथे आरोपी आल्याची माहिती घनवट यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांसह शिरवळ येथे छापा टाकून वरील चौघांना पकडले. गांधीनगर, कोल्हापूर, अहमदनगर तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हसवे गावाच्या कॅनॉलजवळ जोडप्यांना मारहाण करून त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने आणि रक्कम लुटल्याचे बरेच गुन्हे या टोळीकडून उघडकीस आले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक चिंचकर, सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, हवालदार मोहन घोरपडे, उत्तम दबडे, नितीन शेळके, प्रवीण कडव, संजय जाधव, नितीन भोसले, आदी कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. (प्रतिनिधी)