‘कही पें निगाहे, कही पें निशाना!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:41 AM2021-03-09T04:41:21+5:302021-03-09T04:41:21+5:30

कराड : गत आठवड्यात कृष्णा कारखाना निवडणुकीसंदर्भात मुंबईत खलबते झाली. त्यात ॲड. उदय पाटील महाविकास आघाडी पॅनलसाठी आग्रही राहिल्याचे ...

‘Look somewhere, aim somewhere!’ | ‘कही पें निगाहे, कही पें निशाना!’

‘कही पें निगाहे, कही पें निशाना!’

Next

कराड : गत आठवड्यात कृष्णा कारखाना निवडणुकीसंदर्भात मुंबईत खलबते झाली. त्यात ॲड. उदय पाटील महाविकास आघाडी पॅनलसाठी आग्रही राहिल्याचे समजले. त्यानंतर काँग्रेसचे नेते ॲड. उदय पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेऊन राजकीय चर्चा केली म्हणे! या बैठकीत कृष्णा कारखाना निवडणुकीबरोबरच जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाल्याचे कळते; त्यामुळे ‘कही पें निगाहे, कही पें निशाना’ साधायचा असल्यानेच उदय पाटील चाचपणी करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विलासराव पाटील उंडाळकर गटाने नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आता विलासराव पाटील यांचे नुकतेच निधन झाल्याने या गटाची धुरा त्यांचे सुपुत्र ॲड. उदय पाटील सांभाळत आहेत. काकांच्या पश्चात कृष्णा कारखान्याची पहिलीच निवडणूक होत असल्याने ॲड. पाटील यांना त्यांच्या गटाचा करिष्मा दाखवून द्यावा लागणार आहे. म्हणून तर मुंबईत दोन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कृष्णा कारखाना निवडणुकीत महाविकास आघाडी पॅटर्न राबवावा यासाठी स्वतः उदय पाटील आग्रही राहिल्याचे समजते.

‘कृष्णा’च्या खलबतांनंतर दोन दिवसांनी ॲड. उदय पाटील यांनी मुंबईतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. कृष्णा कारखाना निवडणुकीच्या चर्चेचे निमित्त करीत त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीची चर्चा केल्याचे खात्रीशीर समजते; त्यामुळे कृष्णा कारखाना निवडणुकीबरोबरच त्यांना जिल्हा बँकेचा निशाणा साधायचा आहे हे स्पष्ट होते.

सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही एकेकाळी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काँग्रेसच्या विलासराव पाटील-उंडाळकर यांची पकड होती. त्याबरोबरच कराड दक्षिणचा गडही त्यांनी कायम राखून ठेवला होता. कालांतराने राजकीय स्थित्यंतरे झाली आणि जिल्हा बँक राष्ट्रवादीने ताब्यात घेतली. मात्र, उंडाळकर जिल्हा बँकेचे संचालक म्हणून राहिलेच होते.

आता काकांच्या निधनानंतर राजकारणात आपले स्थान टिकविण्याचे काम अँड. पाटील यांना करायचे आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विलासराव पाटील उंडाळकर यांनी नेहमीच सोसायटी मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. यावेळी त्याच जागेवर उदय पाटील यांना निवडणूक लढवायची आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचेही नाव या मतदारसंघातून चर्चेत आहे. सध्याच्या घडीला उदय पाटील व मंत्री बाळासाहेब पाटील गटात तेवढे सख्यही दिसत नाही. त्यामुळे कराड तालुक्यातील सोसायटी गटातून उमेदवार कोण, याची उत्सुकता लागून राहिलेली आहे.

जिल्हा बँकेत कराड दक्षिणमधून असणारी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढण्याची संधी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत आहे; पण त्या संधीचा ते लाभ कसे घेतात, हे पाहावे लागणार आहे.

चौकट :

भाजप काय करणार?

कराड तालुक्यातून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात सोसायटी मतदारसंघातून सध्या मंत्री बाळासाहेब पाटील व ॲड. उदय पाटील यांच्याच नावांची चर्चा आहे; पण विरोधातील भाजप या निवडणुकीत काय करणार, डॉ. अतुल भोसले पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरणार की कोणाला संधी देणार, हे पाहावे लागेल.

चौकट

अन्य पर्याय चोखाळणार का...

ॲड. उदय पाटील सोसायटी मतदारसंघाबरोबरच खरेदी विक्री संघ, प्रक्रिया संस्था यामधून ही निवडणूक लढवू शकतात; पण तिथे अगोदरपासून पकड असणाऱ्या जिल्ह्यातील दावेदारांना थांबविणार कोण? हा प्रश्न आहेच.

फोटो :

8 उदय पाटील 01

Web Title: ‘Look somewhere, aim somewhere!’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.