शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जावळीतील संवेदनशील गावांवर नजर

By admin | Updated: August 3, 2015 21:50 IST

भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी : पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश

कुडाळ : जावळी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी ३३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मंगळवारी २३ ग्रामपंचायतींसाठी मतदानप्रक्रिया पार पडत आहे. त्यादृष्टीने निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून, निवडणूक होत असलेल्या गावांमधील राजकीय हालचालींवर प्रशासनाची करडी नजर आहे. तर २३ पैकी ७ ग्रामपंचायती या संवेदनशील असल्यामुळे अशा गावांवर पोलिसांनी नजर ठेवून सतर्क राहण्याचे आदेश तहसीलदार रणजित देसाई यांनी दिले आहेत.तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावांतर्गत असलेल्या गटातटांमध्ये होताना दिसतात. त्यामुळे गावांतर्गत गटतट हे प्रतिष्ठेने निवडणूक लढविताना दिसून येतात. त्यामुळे प्रसंगी वादविवादाचे प्रसंगदेखील ओढावतात. गेल्या निवडणुकीत वाद झाल्यामुळे काही गावांमधील ग्रामस्थांनी तहसीलदार देसाई यांना समक्ष भेटून गत निवडणुकीत झालेल्या प्रकाराची माहिती दिली व भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी शक्य त्या उपाययोजना प्रशासनाने कराव्यात, अशी मागणी केली.त्यादृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार देसाई यांनी सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने जी नियमावली केली आहे, त्याप्रमाणे मतदान करून घ्यावे, तसेच पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहून संवदेनशील गावांवर नजर ठेवून राहण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)तालुक्यात ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत त्या शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने योग्य ती घबरदारी घेतली आहे. त्यानुसार सर्व यंत्रणेला सूचना दिल्या गेल्या आहेत.- रणजित देसाई, तहसीलदार, जावळी.तालुक्यातील होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुका या भयमुक्त वातावरणात पार पडल्या जाव्यात, तसेच संवेदनशील गावांसह राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची निवडणूक होत असलेल्या गावांवर आमची नजर असून, तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार. - समाधान चवरे, सहायक पोलीस निरीक्षक