शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

‘कोरोना’पेक्षा एकटेपणा अधिक भीतीदायक...भारतात आल्याचे फार मोठे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:48 IST

चीनमध्ये हॉस्पिटलमधून हा आजार जास्त पसरतो आहे. इतर आजारांवर हॉस्पिटलऐवजी घरीच उपाय केले जातात. तेथील डॉक्टरांना आपली भाषा समजत नसल्याचीही मोठी अडचण आहे. - अश्विनी पाटील, चीनमध्ये अडकलेली भारतीय महिला

दीपक शिंदे ।सातारा : चीनमध्ये आलेला कोरोना व्हायरस हा जीवघेणा आहे. पण, तो बरादेखील होऊ शकतो. आत्तापर्यंत १२ ते १५ हजार लोक बरे झाले आहेत. पण मृत्यू झालेल्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे हा आजार केवळ जीवघेणाच आहे, असे आपल्याला वाटते. परदेशात असल्यामुळे एकटेपणा काय असतो याची आम्हाला जाणीव झाली. त्याबरोबरच परकेपणा कायम जाणवत राहिला. भारतात असतो तर काहीच काळजी नव्हती त्यावर कशीही मात केली असती. त्यामुळे कोरोनापेक्षा एकटेपणा अधिक भीतीदायक असल्याचे मत चीनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक अश्विनी पाटील यांनी व्यक्त केले.

प्रश्न : चीनमध्ये सध्या काय परिस्थिती आहे ?उत्तर : चीनमधील परिस्थिती अजून जैसे थे आहे. व्हायरस पसरतो आहे. केवळ चीनपुरता मर्यादित न राहता तो आता साऊथ कोरिया आणि इराणमध्येही पसरतो आहे. युरोपिय देशांमध्ये व्हिसाची गरज नसल्याने लोक एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करतात. त्यामुळे हा आजार अधिक पसरतो आहे.

प्रश्न : चीनमध्ये अजून किती भारतीय आहेत?उत्तर : भारतीय दूतावासाने जेवढ्या लोकांना भारतात परत पाठविता येईल. तेवढ्या सगळ्यांना पाठविण्याचा प्रयत्न केला आहे. वुहानमधील बहुतेक लोक भारतात आले आहेत. मात्र, चीनच्या इतर भागातही अजून काही भारतीय असण्याची शक्यता आहे. त्यांनाही भारतात आणण्यासाठी दूतावास प्रयत्न करत आहे.

प्रश्न : खाद्यपदार्थांची उपलब्धता आहे का ?उत्तर : घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. पण, चीन सरकार सुपर मार्केटच्या माध्यमातून घरापर्यंत उपलब्ध पदार्थ पोहोचविण्याची जबाबदारी घेते.

१ महिना ३ दिवस दिव्यत्वाची प्रचितीचीनमध्ये मी एक महिना आणि ३ दिवस एकटी होते. सकाळी उठले की नाष्ट्याची तयारी, स्वयंपाक तयार करणे, व्यायाम करणे, आई - वडील, पती, नातेवाईक यांच्याशी बोलणे यामुळे वेळ जात होता. तरीही भारतात कधी येणार याची हुरहूर लागून राहिलेली होती. जुने चित्रपट पाहणे आणि चीनमध्ये असलेल्या भारतीयांशी काय हवे नको, याबाबत चर्चा करणे असा दिनक्रम होता. आम्ही चीनमध्ये असलेले लोक एकमेकांची काळजी घेत होतो.

नव्याने काही मित्र-मैत्रिणी तयार झाल्या. कोरोना व्हायरस हा शरीरात शिरल्यानंतर त्याला तुम्हाला मारायचे नसते तर तुमच्या शरीरात राहून जगायचे असते. पण, या व्हायरसमुळे ह्युमिनिटी कमी होते आणि न्यूमोनिया होतो. जर कडक ऊन असेल तर हा व्हायरस फार काळ जगू शकत नाही.

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारत