शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

कुस्ती आखाड्यात लोकसभेची दंगल; जाधवांची पवारांशी जवळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:45 PM

खंडाळा : सातारा लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणांगणात हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रमुख पक्षांनी आपले मोहरे मैदानात उतरविण्यासाठी ...

खंडाळा : सातारा लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणांगणात हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रमुख पक्षांनी आपले मोहरे मैदानात उतरविण्यासाठी कोणत्या न कोणत्या माध्यमातून संपर्क सुरू केल्याचे दिसते. सातारा लोकसभेच्या आखाड्यात तिसऱ्यांदा शड्डू ठोकण्यासाठी पुरुषोत्तम जाधव यांनी विविध उपक्रमांतून तयारी चालवली आहे. कुस्ती आखाड्यातून जिल्ह्याची अस्मिता जागृत करत राष्ट्रवादीच्या आखाड्यातही त्यांनी शड्डू ठोकल्याचे दिसते.पुरुषोत्तम जाधव यांनी २०१९ च्या लोकसभेची तयारी सुरू असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने पुरुषोत्तम जाधव हे शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचले. पवारांनी संघाचे सामने स्वत: उपस्थित राहून पाहिले. तसेच या संघातील मल्लांचे कौतुकही केले. यानिमित्ताने सातारा लोकसभेसाठी इच्छुक असलेले पुरुषोत्तम जाधव यांची शरद पवार यांच्याशी जवळीक वाढली आहे. लोकसभेसाठी साताºयाच्या जागेवरून राष्ट्रवादीतच खडाजंगी सुरू असताना या नव्या घडामोडींमुळे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.पुरुषोत्तम जाधव यांनी २००९ मध्ये शिवसेनेत प्रवेश करून सेनेचा भगवा हातात घेऊन त्यावेळी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात थेट उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली. निवडणुकीत सेनेचा धनुष्यबाण खांद्यावर पेलून तब्बल २ लाख ३५ हजार ६८ एवढी मते मिळवली होती.त्यानंतर सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडले होते. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी साताºयाची जागा युतीच्या घटकपक्षाला दिल्याने त्यांना या निवडणुकीत ऐनवेळी अपक्ष उमेदवारी करावी लागली. तरीही त्यावेळी १ लाख ५५ हजार ९३८ एवढी लक्षवेधी मते घेतली होती. विशेषत: कºहाड दक्षिण मतदारसंघात जाधवांच्या किटलीने वातावरण गरम केले होते.सध्या सातारा लोकसभेसाठी विविध राजकीय व्यासपीठावरून चर्चा होऊ लागल्या आहेत. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीतील दोन राजे घराण्यात शाब्दिक चकमकी घडत आहेत. सेनेचा आवाज कधीतरी धडकत आहे. भाजपानेही जिल्ह्यात आपला विस्तार वाढवला आहे. अजूनही इनकमिंगच्या वाटा अनेकांकडून चोखाळल्या जात आहेत. त्यातच पुरुषोत्तम जाधव यांनी भाजपाच्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘संपर्क फॉर समर्थन’ हा उपक्रम हाती घेऊन जिल्ह्यात बैठकाही घेतल्या होत्या. त्याचबरोबर जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जाऊन कुस्तिगीर परिषदेच्या वतीने तरुणांची ताकद एकवटण्याचाही प्रयत्न सुरू आहे.मध्यंतरी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्यक्रमांना लावलेली हजेरी आणि इतर नेत्यांसह राष्ट्रवादीशी वाढती जवळीक अनेकांच्या नजरा विस्फारणारी ठरत आहे. त्यामुळे यावेळी लोकसभेचे मैदान मारण्यासाठी जाधवांची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.पाटलांच्या सूचना अन् पवारांशी जवळीकलोकसभेच्या निवडणुकीला अजून अर्ध वर्ष बाकी आहे; मात्र अगोदरच पुरुषोत्तम जाधवांनी तयारी केल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. या संपर्क फॉर समर्थन मोहिमेपूर्वी जाधवांना दस्तुरखुद्ध मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच तयारीला लागण्याच्या सूचना केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर अलीकडच्या काळातील पवारांशी वाढती जवळीक यामुळे येणाºया काळात आणखी कोणत्या घडामोडी घडणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.