बाप्पांच्या हाती ‘लोकमत सातारा’!
By Admin | Updated: August 12, 2015 21:45 IST2015-08-12T21:45:47+5:302015-08-12T21:45:47+5:30
‘विद्यापती गणेश माझा..‘ने दिली प्रेरणा

बाप्पांच्या हाती ‘लोकमत सातारा’!
सातारा : क्षेत्र माहुली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या महिलेच्या खुनाचा तपास निर्णायक टप्प्यावर आला असून, याप्रकरणी या महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिलेच्या खुनामागील नेमक्या कारणाचा तपास पोलीस करीत आहेत. सोमनाथ ऊर्फ सोमण्णा चंद्राम पुजारी (वय ३४, मूळ रा. चौंड्याळ-इंडी, कर्नाटक, सध्या रा. कऱ्हाड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. मृत महिलेचे नाव सातव्वा पुजारी (३०) असल्याचे निष्पन्न झाले असून, सोमण्णा तिचा पती असल्याचे पोलिसांनी सांगितले. दि. २० जुलै रोजी क्षेत्र माहुली येथील पाणंद रस्त्यावर एका उसाच्या शेतात अनोळखी महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. तिचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालावरून दिसून आले होते. मात्र, तिची ओळख लगेच पटू शकली नव्हती. दरम्यान, मृत महिला ही सातव्वा पुजारी असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर तिचा खून कोणी आणि का केला असावा, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आणि सोमण्णावरील संशय बळावत गेला. प्राथमिक माहितीनुसार, सातव्वाचे दागिने घेऊन सोमण्णा इंडी येथे मूळ गावी गेला होता. जमीन घेण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. परंतु आपले दागिने परत आणण्यासाठी सातव्वा तेथे पोहोचली. तेथून सोमण्णाने तिला गोड बोलून परत आणले आणि तिचा खून केला असावा, असा संशय आहे. सोमण्णाला दुसरे लग्न करायचे होते, अशीही माहिती पोलिसांना मिळाली असून, सातव्वाच्या चारित्र्यावर तो संशय घेत होता, असेही उघड झाले आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजीव मुठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शेख, पवार, विशाल सर्वगौड, वसंत साबळे, शिर्के आदींनी या गुन्ह्याचा छडा लावला. या घटनेचा सहायक पोलीस निरीक्षक कठाळे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी) रेल्वेने आल्याची शक्यता क्षेत्रमाहुली येथे ज्या पाणंद रस्त्यावर सातव्वा पुजारी हिचा मृतदेह आढळला तो रस्ता पुढे रेल्वेस्थानकाकडे जातो. उसाची नुकतीच लागण झालेल्या शेतात तिचा मृतदेह आढळला होता. दरम्यान, ती आपले दागिने परत आणण्यासाठी इंडी येथे गेली होती हे स्पष्ट झाले आहे. तेथून सोमण्णाने तिला गोड बोलून रेल्वेने आणले असावे आणि तिचा खून केला असावा, असा संशय आहे.