‘लोकमत’ कऱ्हाड कार्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव

By Admin | Updated: January 9, 2017 22:46 IST2017-01-09T22:46:20+5:302017-01-09T22:46:20+5:30

आठवा वर्धापनदिन उत्साहात : वाचक, जाहिरातदार, एजंट, हितचिंंतकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

'Lokmat' Happy shower at the Karhad office | ‘लोकमत’ कऱ्हाड कार्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव

‘लोकमत’ कऱ्हाड कार्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव

कऱ्हाड : आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या शुभेच्छा अशा उत्साही वातावरणात ‘लोकमत’च्या कऱ्हाड कार्यालयाचा आठवा वर्धापन दिन सोमवारी साजरा करण्यात आला. वाचक, जाहिरातदार, एजंट, हितचिंंतक, विविध
क्षेत्रांतील मान्यवर यांनी ‘लोकमत’च्या स्नेहमेळाव्यास हजेरी लावून ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव
केला.
‘लोकमत’ कऱ्हाड कार्यालयाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात सर्वप्रथम ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, संग्राम माळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारिस, मुख्याधिकारी विनायक औंधकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, इंद्रजित मोहिते, मदनराव मोहिते, अविनाश मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कऱ्हाड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, एनयूआयएसचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवराज मोरे, बांधकाम व्यावसायिक हणमंतराव चव्हाण, पाटणच्या नगराध्यक्षा महाजन, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, नगरसेवक अप्पा माने, प्रमोदसिंह कदम, नगरसेविका स्मिता
हुलवान, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेविका विद्या पावसकर, किरण पाटील, हणमंत पवार, गजेंद्र कांबळे, विनोद भोसले, नगरसेवक अतुल शिंदे, विनायक विभुते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, हिंतचिंतक, जाहिरातदार, एजंट यांनी ‘लोकमत’ला शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती.
‘लोकमत’च्या वतीने वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, आवृत्तीप्रमुख सचिन जवळकोटे आदींनी शुभेच्छा स्वीकारल्या. अबुबकर सुतार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी गणेश वंदना सादर करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Lokmat' Happy shower at the Karhad office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.