शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोठडीच्या लोखंडावर लोखंडेची हातचलाखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:00 IST

दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दहा बाय वीसची कोठडी. शनिवारी रात्री या कोठडीमध्ये नऊजण होते. त्यामध्ये चंद्रकांत लोखंडेचाही समावेश होता; मात्र कोठडीच्या लोखंडावर लोखंडेची हातचलाखी चालली. सातारा पोलिसांच्या इतिहासात अशा पद्धतीने एक आरोपी प्रथमच फरारी झाला.गेल्या तीन दिवसांपासून चंद्रकांत या कोठडीमध्ये होता. मात्र, शनिवारी रात्री त्याची अस्वस्थता नेहमीपेक्षा अधिकच वाढलेली ...

दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दहा बाय वीसची कोठडी. शनिवारी रात्री या कोठडीमध्ये नऊजण होते. त्यामध्ये चंद्रकांत लोखंडेचाही समावेश होता; मात्र कोठडीच्या लोखंडावर लोखंडेची हातचलाखी चालली. सातारा पोलिसांच्या इतिहासात अशा पद्धतीने एक आरोपी प्रथमच फरारी झाला.गेल्या तीन दिवसांपासून चंद्रकांत या कोठडीमध्ये होता. मात्र, शनिवारी रात्री त्याची अस्वस्थता नेहमीपेक्षा अधिकच वाढलेली होती. अधून-मधून रात्री उठून लघुशंकेस जायचे असल्याचे तो सांगत होता. एवढेच नव्हे तर या कोठडीत माझा जीव गुदमरतोय, असं तो सहआरोपींशी बोलत होता. कोठडीतल्या प्रत्येक आरोपीशी आदल्या रात्री त्याने एकप्रकारे ओळखपरेड घेतली. पण कशासाठी? याचं कारण मात्र गुलदस्त्यातच राहिलं.चंद्रकांत पळून गेल्यानंतर जिल्हा पोलिस दलाचं मुख्यालय हादरून गेलं. रविवारी सुटी असतानाही अनेक अधिकाºयांनी कोठडीकडे धाव घेतली. पंधरा फूट उंचीच्या तटबंदीवरून चंद्रकांतने कसे पलायन केले असेल? यासह अनेक प्रश्नांचा कल्लोळ मनात घेऊन अधिकाºयांनी चौकशीला सुरुवात केली. चंद्रकांतसोबत रात्री कोठडीत असणाºया आणि त्याच्यावर लक्ष ठेवणाºया कर्मचाºयांनी शनिवारच्या रात्री चंद्रकांतनं कशी चुळबुळ सुरू केली होती? याची इत्थंभूत माहिती अधिकाºयांना दिली. हे हुबेहूब कथन एका कर्मचाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ टीमला सांगितलं.चंद्रकांतनं शनिवारी रात्री प्रत्येकाला नाव, गाव, कोणत्या गुन्ह्यात अटक झाली? अशी सगळी माहिती विचारली. ज्या दिवशी तो कोठडीत आला. त्या दिवसांपासून तो अबोलच होता. परंतु शनिवारच्या रात्री त्याच्या हालचाली वेगाने वाढलेल्या होत्या. कोठडीतला सीसीटीव्ही या नऊ संशयितांवर नजर ठेवून होता. परंतु चंद्रकांतने एकदाही त्याचा चेहरा सीसीटीव्हीकडे वळविला नव्हता. कदाचित मनातील अस्वस्थता कॅमेरा टिपेल, याची त्याला धास्ती होती.मान खाली घालून तो इतर कोठडीतील संशयितांशी बोलत होता. तुला जामीन कोण होणार? तुझ्या घरी कोण-कोण आहेत? असं बोलून तो आता आपण पोलिसांच्या तावडीतून सुटणे अशक्य असल्याचे त्यांना सांगत होता. मध्यरात्री तीनच्या सुमारासही चंद्रकांत झोपेतून उठला होता. त्यावेळी त्याने लघुशंकेचे कारण सांगितले होते. मात्र, तेथील गार्डने त्याला गप्प झोप असं सांगितल होतं. सगळे गाढ झोपेत असतानाच त्याला डाव साधायचा होता. मात्र, संबंधित गार्डने त्याला झोपून राहण्याचा सल्ला दिला असेल.कोठडीमध्ये दोन स्वच्छतागृह आहेत. एक आतमध्ये गेल्यानंतर बाहेर दुसºयाने उभे राहायचे. असा येथे नियम आहे. खडखडीत उजाडल्यानंतर चंद्रकांत पहिल्यांदा बाथरुममध्ये जात होता. मात्र, यावेळी त्याने असे केले नाही. त्याच्या अगोदर चौघे जाऊन आले. मात्र, तो कोठडीतच थांबला होता. रात्री लघुशंकेची वारंवार तक्रार करणारा चंद्रकांत चुळबुळ न करता बसून होता. मात्र, याचीही संबंधित गार्डना भणक लागली नाही. स्वच्छतागृहात जाण्याचा त्याचा नंबर आल्यानंतर तो अगदी शांतपणे गेला.पलायनाचे गूढ की गुपित!चंद्रकांतच्या पलायनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुमारे पंधरा फूट उंच भिंत असलेल्या तटबंदीवरून तो कसा काय पळून जाऊ शकतो? अशीही शंका उपस्थित होत आहे. त्याने स्वच्छतागृहाची खिडकी तोडल्यानंतर कोठडीच्या मागच्या बाजूला तो गेला, हे पोलिसांनाही माहिती आहे. पण त्याने पंधरा फूट उंच भिंतीवर उडी न मारता थेट मुख्य गेटमधून पलायन केले असावे. अशीही दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र ,या शक्यता पोलिस मानायला तयार नाहीत.पुढच्या गेटने आरोपीने पलायन केले तर आपण आणखीनच गोत्यात येणार, हे जाणून असलेल्या पोलिसांनी पंधरा फूट तटबंदीलाच जबाबदार धरले आहे. गेटमधून नव्हे भिंतीवरून उडी टाकूनच तो गेला, असे पोलिस दावा करत आहेत. मात्र, दाव्यापाठीमागे गूढ आहे की पोलिसांचे गुपित, हे लवकरच तपासाअंती समोर येईल.‘तो’ थरारसीसीटीव्हीत कैद !आरोपीने पलायन केल्याने शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर व्यथित झाले आहेत. त्यांना या प्रकरणाबाबत विचारणा केली असता त्यांनी पोलिसांवर ओढावलेली नामुष्की असल्याचे सांगितले. तो कसा पळून गेला? याचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मात्र, त्याची चौकशी सुरू असून, संबंधित दोषींवर नक्कीच कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले. सारंगकर यांच्या म्हणण्यानुसार जर हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असेल तर चंद्रकांत लोखंडे भिंतीवरून उडी मारून गेलाच नसावा. त्याचे कारण कोठडीच्या मागच्या बाजूला सीसीटीव्ही नाहीत. याचा अर्थ चंद्रकांत कोठडीच्या मागच्या बाजूने पुढच्या मुख्य गेटवर आला आणि येथूनच त्याने पलायन केले असावे. हा सारा प्रकार गेटवर असणाºया सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सारंगकर यांचे म्हणणे आहे.