लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST2021-04-18T04:38:42+5:302021-04-18T04:38:42+5:30

रामापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील एक वर्षापासून लॉकडाऊन, कोरोनाचे निर्बंध यामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. काही निर्बंध उठवून ...

Lockdown puts small businesses in financial trouble | लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीत

लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीत

रामापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील एक वर्षापासून लॉकडाऊन, कोरोनाचे निर्बंध यामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. काही निर्बंध उठवून कुठेतरी कमाई सुरू होत होती. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची गाडी हळूहळू रुळावर येत होती, त्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली.

या लाटेमध्ये तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरोनाच्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला; परंतु या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाबरोबर जे छोठे व्यापारी, दुकानदार, चहाटपरी व्यावसायिक यांचे मात्र हाल होत आहेत.

कोविडमुळे तालुक्यातील शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे वीटभट्टी कामगारांपासून ते शेतमजुरांपर्यंत सर्वांच्या हाती काम राहिले नाही. गेल्या एक वर्षापासून कोरोनामुळे सगळ्या क्षेत्रांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात छोटे व्यावसायिक, दुकानदार मजूर वर्गाची संख्या जास्त प्रमाणात आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांची अवस्था फार दयनीय झाली आहे.

व्यवसाय सुरू करताना बँका आणि स्थानिक पतसंस्थांकडून कर्ज काढून व्यवसाय सुरू केले. व्यवसायाला चांगली सुरुवात झाली होती. बँका, पतसंस्थांचे हप्तेही वेळेत जात होते. मात्र, मागील मार्चपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकांचे हप्तेही वेळेत भरता आले नाहीत. त्यामुळे व्यवसाय बंद मात्र बँकेचे व्याज चालू आहे. त्यामुळे बँकांचे हप्ते भरायचे कसे, हा प्रश्न तालुक्यातील छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांना पडत आहे.

Web Title: Lockdown puts small businesses in financial trouble