लाॅक तुटलं नाही म्हणून चक्क दरवाजालाच पाडलं चाैकोनी छिद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:48+5:302021-09-07T04:46:48+5:30

सातारा : बंद बंगल्यात चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्यांना दरवाजाचे कुलूप तुटले नाही. त्यामुळे चोरट्यांनी शक्कल लढवून दरवाजाला चाैकोनी छिद्र ...

The lock did not break, so I knocked on the door | लाॅक तुटलं नाही म्हणून चक्क दरवाजालाच पाडलं चाैकोनी छिद्र

लाॅक तुटलं नाही म्हणून चक्क दरवाजालाच पाडलं चाैकोनी छिद्र

सातारा : बंद बंगल्यात चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्यांना दरवाजाचे कुलूप तुटले नाही. त्यामुळे चोरट्यांनी शक्कल लढवून दरवाजाला चाैकोनी छिद्र पाडलं. त्यामधूनच चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातील तब्बल १० लाखांचे २० तोळ्यांचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील केसरकर पेठेमध्ये उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी, केसरकर पेठेत असलेल्या प्रभू कृपा हॉस्पिटलसमोरील आशीर्वाद बंगल्यातील कुटुंबीय केरळला नातेवाईकांकडे गेले होते. चोरट्यांनी १ ते ५ सप्टेंबरदरम्यान त्यांच्या बंगल्यात प्रवेश केला. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचा लाॅक तोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, लाॅक तुटले नाही. सरतेशेवटी चोरट्यांनी शक्कल लढविली. दरवाजाला चाैकोनी छिद्र पाडले. त्यानंतर बंगल्यात चोरट्यांनी प्रवेश केला. बंगल्यातील कपाटात ठेवलेले रोख रक्कम १० हजार रुपये व १० लाख रुपये किमतीचे २० तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. शीतल नाईकवडी (वय ४१, रा. पुणे) यांच्या वडिलांचा हा बंगला आहे. त्यांचे वडील डाॅक्टर आहेत. हे सर्व कुटुंबीय केरळ येथे गेले आहेत. ते परत आल्यानंतर त्यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचे समोर आले. या प्रकारानंतर साहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी घटनास्थळी भेट दिली. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम हे करत आहेत.

फोटो : ०५ सातारा स्टोरी...

Web Title: The lock did not break, so I knocked on the door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.