भरधाव कंटेनरने दुचाकीस्वार युवकाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:04+5:302021-01-08T06:07:04+5:30
अमित पांडुरंग पाटील (वय २३, रा. सुपने, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे, तर अजहर शेख ...

भरधाव कंटेनरने दुचाकीस्वार युवकाला चिरडले
अमित पांडुरंग पाटील (वय २३, रा. सुपने, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे, तर अजहर शेख (रा. साकुर्डी, ता. कऱ्हाड) असे जखमीचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूणहून कऱ्हाडच्या दिशेने निघालेला कंटेनर रात्री साडेसात वाजण्याच्यासुमारास कऱ्हाड तालुक्यातील मुंढे गावच्या हद्दीत पोहोचला. वास्तविक, या रस्त्यावर विजयनगरपासून मुंढे गावापर्यंत रस्त्याला पूर्णपणे उतार आहे. संबंधित कंटेनर भरधाव वेगात या उताराच्या वळणावरून खाली आला. त्याचवेळी चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरची दुभाजकाला धडक बसली. दुभाजक तोडून कंटेनर कऱ्हाड-चिपळूण लेनवर घुसला. समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना त्याने चिरडले. ही धडक एवढी भीषण होती की, अमित पाटील या युवकाचा मृतदेह अक्षरश: छिन्नविछिन्न झाला, तर अजहर शेख हा युवक गंभीर जखमी झाला.
अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच कऱ्हाड शहर वाहतूक शाखा व अपघात विभागाचे पोलीस कर्मचारीही तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून अपघातस्थळाचा पंचनामा केला. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात झाली नव्हती.
फोटो : ०४केआरडी०८
कॅप्शन : गुहाघर-विजापूर महामार्गावर मुंढे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत सोमवारी रात्री कंटेनरने दोन दुचाकीस्वारांना चिरडले.