शेनवडीच्या सरपंचपदी लीना कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST2021-02-27T04:51:31+5:302021-02-27T04:51:31+5:30
वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील शेनवडी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी लीना धनाजी कदम तर उपसरपंचपदी सचिन पांडुरंग वाघमारे यांची निवड ...

शेनवडीच्या सरपंचपदी लीना कदम
वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील शेनवडी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी लीना धनाजी कदम तर उपसरपंचपदी सचिन पांडुरंग वाघमारे यांची निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीची विशेष सभा पार पडली.
यावेळी सरपंच पदासाठी भाजपा व अपक्ष युतीच्यावतीने लीना कदम यांनी अर्ज दाखल केला व त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंधू कदम यांनी अर्ज दाखल केला होता. ९ पैकी ५ मते घेत लीना कदम सरपंचपदी विराजमान झाल्या. तर उपसरपंच पदासाठी भाजपा अपक्ष युतीकडून सचिन वाघमारे यांनी अर्ज दाखल केला होता तसेच त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हरिश्चंद्र खिलारी यांचा ९ पैकी ५ मते घेऊन पराभव करत उपसरपंचपदी विजयी झाले. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य जयश्री कदम, मनीषा खिलारी, सूरज कदम, संजय खिलारी, नंदा खिलारी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. बी. शिंदे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक शिवयोगी वंजारी यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, भाजपा तालुकध्यक्ष शिवाजीराव शिंदे, माजी सरपंच मोहन कदम, माजी सरपंच बाळकृष्ण खिलारी, विजय कदम, आप्पासाहेब खिलारी, सचिन शिंदे, यशवंत पारसी, हरीश कदम, सिद्धराम कदम, शहाजी खिलारी, आबासाहेब बनसोडे, पोलीस पाटील संतोष खिलारी व सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले.