लिंबाचीवाडीची यात्रा सलग दुसऱ्या वर्षीही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:41 IST2021-04-09T04:41:15+5:302021-04-09T04:41:15+5:30

अंगापूरः लिंबाचीवाडी (ता. सातारा) येथील ग्रामदैवत श्री कारजाई देवीची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे, अशी ...

Limbachiwadi Yatra canceled for second year in a row | लिंबाचीवाडीची यात्रा सलग दुसऱ्या वर्षीही रद्द

लिंबाचीवाडीची यात्रा सलग दुसऱ्या वर्षीही रद्द

अंगापूरः लिंबाचीवाडी (ता. सातारा) येथील ग्रामदैवत श्री कारजाई देवीची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती उपसरपंच रामदास कणसे यांनी दिली. कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे. त्याचे संसर्ग व संक्रमण टाळण्यासाठी शासनाने सध्या जमाबंदी व संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. शासनाच्या नियमाचे पालन करून यात्रा काळात फक्त धार्मिक विधी पार पाडण्यात येतील तसेच गावातील सर्व मंदिरे बंद राहतील दि. ९ (शुक्रवार) व दि. १० (शनिवार) या यात्रा काळातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच कोरोना संक्रमण टाळण्यासाठी यात्राकाळात पै-पाहुणे आमंत्रित करू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. हा निर्णय उपसरपंच, सदस्य यात्रा कमिटी यांच्या बैठकीत घेण्यात आला घेण्यात आला आहे, तसेच शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आव्हान बोरगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर यांनी केली.

Web Title: Limbachiwadi Yatra canceled for second year in a row