कळंबे येथील भैरवनाथ मंदिरावर वीज कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST2021-05-03T04:34:28+5:302021-05-03T04:34:28+5:30
किडगाव : सातारा तालुक्यातील कळंबे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या कळसावर रविवारी सायंकाळी चार वाजता वीज कोसळली. यामुळे मंदिरासह ...

कळंबे येथील भैरवनाथ मंदिरावर वीज कोसळली
किडगाव : सातारा तालुक्यातील कळंबे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या कळसावर रविवारी सायंकाळी चार वाजता वीज कोसळली. यामुळे मंदिरासह कळसाचे नुकसान झाले आहे.
किडगाव परिसरात रविवारी दुपारी जोरदार पावसाने झोडपून काढले. या पावसामध्येच मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट झाला. ही वीज कळंबे गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या कळसावर कोसळली. त्यामुळे कळसाला आणि मंदिराच्या शिखराला भेगा पडून या कळसाचे नुकसान झाले. या मंदिराचे बांधकाम गेली आठ-दहा वर्षांपूर्वीच झाले होते.
कळंबेची वार्षिक यात्रा दोन दिवसांपूर्वीच झाली. मात्र, कोरोना काळ असल्याने मंदिर बंदच आहे. मंदिरामध्ये भरदुपारी कोणीही नव्हते. वीज कोसळली, तेव्हा मंदिरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. गावावर आलेले संकट हे भैरवनाथाने स्वतःवरच ओढवून घेतले, अशी चर्चा गावातील वृद्ध माणसांनी व्यक्त केली.
गुलाब पठाण यांनी फोटो मेल केला आहे.