जीवनविद्या मिशनतर्फे साताऱ्यात
By Admin | Updated: December 9, 2014 00:31 IST2014-12-08T22:40:47+5:302014-12-09T00:31:37+5:30
२१ रोजी ‘लाईफ मॅनेजमेंट’ व्याख्यान

जीवनविद्या मिशनतर्फे साताऱ्यात
‘लोकमत’ माध्यम प्रायोजक : जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजन
सातारा : सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनतर्फे रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी साताऱ्यात ‘लाईफ मॅनेजमेंट सीरीज’ व्याख्यानमालेचे दुसरे पर्व आयोजित करण्यात आल्याची माहिती सातारा शाखेचे नामधारक चंद्रशेखर चोरगे यांनी दिली. जिल्हा बँकेच्या सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानमालेत प्रल्हाद वामनराव पै मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आहे.
जीवनविद्या मिशनने ‘उत्कर्ष एक प्रवास’ हा उपक्रम समाजात आयोजित केल्याने मुंबई, पुणे, नागपूर व बेळगाव येथील हजारो युवकांमध्ये सकारात्मक दृष्टकोन निर्माण झाला आहे. याच कार्यक्रमाचे पुढील पर्व कोल्हापूर व गोवा राज्यात सादर होणार आहे. याच संकल्पनेवर आधारित समाजातील उच्चविद्याविभूषित प्रतिष्ठीत मान्यवरांसाठी ‘लाईफ मॅनेजमेंट सीरीज’ या व्याख्यानमालेचे आयोजन ठाणे येथील गडकरी सभागृहात केले होते. पहिल्या पर्वात उपस्थित राहिलेल्या डॉक्टर्स, इंजिनिअर्स, उद्योजक, सरकारी अधिकारी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.
या व्याख्यानमालेचे दुसऱ्या पर्वाचे सातारा शहरात आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा बँकेचे सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानमालेत प्रल्हाद वामनराव पै मार्गदर्शन करणार आहेत, असेही चंद्रशेखर चोरगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मोबदला स्वीकारत नाहीत...
वामनराव पै यांनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यात जीवनविद्येवर आधारित दहा हजारांपेक्षा जास्त प्रबोधने केली. १९९८ मध्ये प्रथम अमेरिका व कॅनडा येथे जीवनविद्या तत्त्वज्ञानावरही मार्गदर्शन केले. मात्र यासाठी ते कोणतीही बिदागी घेत नसत. त्यांनी सर्वसामान्यांना जीवन जगण्याची कला शिकविणारे सत्तावीसहून अधिक ग्रंथ लिहिले असून ते हिंदी, इंग्रजी, कानडी व गुजराती भाषेमधूनही भाषांतरीत झाले आहेत. या ग्रंथांच्या लाखो प्रती संपतात, परंतु याचा मोबदला ते स्वीकारत नव्हते.