अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून करणाऱ्यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:42 IST2021-04-28T04:42:49+5:302021-04-28T04:42:49+5:30

सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील काटपाण मळ्यात राहणाऱ्या बाळू ऊर्फ पांडुरंग पाटील ...

Life imprisonment for murder on suspicion of immoral relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून करणाऱ्यास जन्मठेप

अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून करणाऱ्यास जन्मठेप

सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील काटपाण मळ्यात राहणाऱ्या बाळू ऊर्फ पांडुरंग पाटील याचे दोन विवाह झाले आहेत. आपल्या पत्नीशी गावातीलच सुरेश पांडुरंग जाधव (वय ४०) याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय बाळू ऊर्फ पांडुरंग याच्या मनात होता. या संशयावरून त्याने अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन मलकापूर येथे १३ ऑगस्ट २०१५ रोजी रात्री सुरेश जाधव यांच्यावर सुरी व कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. याबाबत रोहित दिलीप जाधव याने कऱ्हाड शहर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून बाळू ऊर्फ पांडुरंग पाटील याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातील तत्कालिन निरीक्षक आर. एच. राजमाने यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सोळा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी बाळू ऊर्फ पांडुरंग पाटील याला गुन्ह्यात दोषी धरून खूनप्रकरणी जन्मठेप व ५० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.

सरकार पक्षाला उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस नाईक खिलारे, गोविंद माने, धनचंद्र पाटील, महिला पोलीस नाईक रूपाली शिंदे व कॉन्स्टेबल योगीता पवार यांनी सहकार्य केले.

Web Title: Life imprisonment for murder on suspicion of immoral relationship