शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

साताऱ्याच्या त्रिशंकू भागाला अखेर जीवदान !, हद्दवाढीमुळे सुटणार समस्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 18:21 IST

चार भिंतीपासून गोळीबार मैदानापर्यंत दक्षिण दिशेला तब्बल पाच किलोमीटर अंतराच्या परिघात पसरलेला त्रिशंकू परिसर मूलभूत सुविधांपासून आजही कोसोदूर आहे. या भागाचा सातारा शहराच्या हद्दवाढीत समावेश झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिकांच्या आशाही आता पल्लवीत झाल्या आहेत.

ठळक मुद्देसाताऱ्याच्या त्रिशंकू भागाला अखेर जीवदान !, हद्दवाढीमुळे सुटणार समस्यांचे ग्रहणविकासाचा मार्ग मोकळा, स्थानिकांच्या आशा पल्लवीत

सचिन काकडेसातारा : चार भिंतीपासून गोळीबार मैदानापर्यंत दक्षिण दिशेला तब्बल पाच किलोमीटर अंतराच्या परिघात पसरलेला त्रिशंकू परिसर मूलभूत सुविधांपासून आजही कोसोदूर आहे. या भागाचा सातारा शहराच्या हद्दवाढीत समावेश झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिकांच्या आशाही आता पल्लवीत झाल्या आहेत.शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हा परिसर विस्तीर्ण आहे. गोडोलीच्या दक्षिणेकडे अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत हा परिसर पसरलेला आहे. शाहूनगरचा काही भाग हा विलासपूर ग्रामपंचायतीत आहे. तर काही भाग हा शहरात; परंतु जो भाग दोन्हीकडे नाही, तो त्रिशंकू भाग विकासकामांपासून वंचित राहिलेला आहे.

या परिसरात टुमदार बंगले आणि मोठाल्या अपार्टमेंट तयार झाल्या असल्या तरी रस्त्यावरची वीज, कॉलन्यांमधील रस्ते, गटार, कचरा वाहून नेण्याची यंत्रणा अद्याप या परिसरात पोहोचल्या नाहीत. हे लोक कर भरत नसल्याने पालिका अथवा जवळची ग्रामपंचायत त्यांना सुविधा देत नाही.या त्रिशंकू भागाचा स्थानिक स्वराज्य संस्थेत सहभाग करुन घ्यावा आणि येथील रहिवाशांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार केली जात होती. या मागणीला आता मूर्त रुप प्राप्त झाले आहे.

शासनाच्या नगरविकास विभागाने सातारा शहराच्या हद्दवाढीची अधिसूचना जाहीर केल्याने शहरासह उपनगर व त्रिशंकू भागाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मोठी विकासकामे प्राधान्याने मार्गी लागतीलच; परंतु रस्ते, ओढे, गटारे, पाणी, वीज या मुलभूत सेवा प्राधान्यांने मार्गी लावणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.या समस्या लागतील मार्गी

  • रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार, ओढ्यांचे रुंदीकरण
  • घंटागाड्या, स्ट्रीट लाईट, घनकचरा निर्मूलन व सांडपाणी प्रकल्प
  • सुसज्ज रुग्णालय, बालोद्यान, क्रींडागण विकास, झोपडपट्टी विकास
  •  खुल्या व सार्वजनिक जागांचा विकास, शॉपिंग सेंटर, रोजगार
  • अजिंक्यतारा किल्ला हद्दवाढीत आल्याने पर्यटन विकासाला चालना

पालिकेच्या महसूलात वाढगेल्या काही वर्षांपासून त्रिशंकू भागात सातारा शहराचा विस्तार वाढत चालला आहे. या परिसरात मोठ्या मिळकती आहे, त्यांचा मिळकत कर कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळत नाही. कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असताना या गंभीर विषयाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही लक्ष नव्हते. हा भाग आता हद्दवाढीत आल्याने पालिकेच्या तिजोरीत कर रुपात मोठा महसूल जमा होणार आहे.त्रिशंकू भागात येणारा परिसरशाहूनगर, गोळीबार मैदान, आझाद नगर चौक, शिवनेरी कॉलनी, माधुरी कॉलनी, जगतापवाडी, चार भिंती परिसर, गोडोलीचा काही परिसर, विलासपूर ग्रामपंचायतीचा काही परिसर, करंजेचा काही परिसर, माजगावकर माळ, आकाशवाणी झोपडपट्टी

त्रिशंकू भाग हद्दवाढीत समाविष्ट झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. घंटागाडीपासून ते बांधकामापर्यंत निर्माण होणाऱ्या प्रत्येक अडचणी आता संपुुष्टात येतील. नागरिकांना पालिकेमार्फत सर्व सेवा-सुविधा जलद गतीने उपलब्ध होतील.- शेखर मोरे-पाटील, नगरसेवक

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसरBorderसीमारेषा