म्हासुर्णेत घराचे पत्रे उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:41 IST2021-05-18T04:41:41+5:302021-05-18T04:41:41+5:30
पुसेसावळी: गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे व पावसाचा तडाखा या परिसराला बसला असून, अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेतमालाचे नुकसान ...

म्हासुर्णेत घराचे पत्रे उडाले
पुसेसावळी: गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे व पावसाचा तडाखा या परिसराला बसला असून, अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेतमालाचे नुकसान झाले असून, काही ठिकाणी आंबा फळांचे ही नुकसान झाले आहे.
म्हासुर्णे (ता.खटाव) येथील वर्षा सतीश वायदांडे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. हे घर जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे दोन खोल्यांचे पत्र्याचे घर असून, ते वादळी वाऱ्यात घरावरील पत्रा उडून जाऊन दूरवर पडला. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसून, फक्त संसारोपयोगी साहित्य व धान्य भिजले आहे. याची माहिती मिळताच, म्हासुर्णे गावचे तलाठी यांनी घराचा पंचनामा केला असून, या कुटुंबाला लवकर शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा वायदांडे कुटुंबीयाकडून होत आहे.
===Photopath===
170521\img-20210517-wa0013.jpg
===Caption===
म्हासुर्णे येथील वर्षा वायदंडे यांचे घराचे पत्रे व घरातीलवस्तु भिजलेल्या अवस्थेत