शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचे उपवर्गीकरण करा, अन्यथा..; मच्छिंद्र सकटेंचा राज्य सरकारला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:49 IST

चर्चेचे गुऱ्हाळ नको, निर्णय हवा

कराड : महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे. अन्यथा, येत्या पावसाळी अधिवेशन काळात विधानभवनावर लेटर बॉम्ब आंदोलन करणार असल्याचा इशारा दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.येथील शासकीय विश्रामगृहात आरक्षण वर्गीकरणाच्या मुद्द्यावर मातंग समाज व दलित महासंघाची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दलित महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, जिल्हाध्यक्ष रामभाऊ दाभाडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरज धोपटे, तालुकाध्यक्ष हरिभाऊ सकटे, तानाजी वायदंडे उपस्थित होते.सकटे म्हणाले, गेल्या १०० वर्षांपासून महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय गाजतो आहे. अलीकडील काही वर्षांत प्रभावी जातीही आरक्षण मागत असल्याने 'देणारे हात आता मागणारे झालेत' हे चित्र दिसत आहे. आरक्षण मागण्याबाबत कोणतीही तक्रार नाही. मात्र, महाराष्ट्रात अनुसूचित जातींत आरक्षणाचे वर्गीकरण करण्याची २५ वर्षांपासूनची आमची मागणी असून देशात ती १९७५ सालापासून केली जात आहे. देशात सर्वप्रथम पंजाब राज्याने २५ टक्के अनुसूचित जातींचे आरक्षण दिले. त्यानंतर तामिळनाडूनेही अ. ब. क. ड. असे वर्गीकरण करून आरक्षण दिले.त्यानंतर काहींनी आक्षेप घेतल्यावर ही बाब न्यायप्रविष्ट झाली. २०२० मध्ये न्यायालयाने आरक्षणातील उपवर्गीकरण हे संविधानिक असल्याच्या निकाल देत वंचितांतील वंचितांना न्याय दिला. त्याचदिवशी तेलंगणा आणि त्यानंतर आंध्र सरकारने आरक्षण लागू केले. कर्नाटकमध्येही तशी प्रक्रिया सुरू आहे. याबाबत महाराष्ट्रात वर्षांवर्ष मागणी करूनही त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनावर लेटर बॉम्ब आंदोलन करणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

लेटर बॉम्ब आंदोलनाच्या स्वरूपाबाबत विचारले असता प्रा. सकटे म्हणाले, हे आंदोलन तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील एक लाख लोक मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आरक्षणातील उपवर्गीकरणाची मागणी करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व विधानसभा आमदार आणि विधान परिषदेच्या आमदारांना मराठा महासंघाच्या वतीने अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा मुद्दा विधानसभेत मांडण्याची मागणी करणार आहोत. तर आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याबाबत गोपनीयता ठेवत पावसाळी अधिवेशनात याबाबतची भूमिका स्पष्ट होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

५८ जातींच्यावतीने लढाईअनुसूचित जातींमध्ये (एससी) एकूण ५९ जातींचा समावेश आहे. त्यातील ५८ जातींसाठी आपण मातंग समाजाच्या वतीने, तसेच दलित महासंघाच्या वतीने ही लढाई लढत असू या आंदोलनास ५८ जातींपैकी १३ जातींचा आपल्याला पाठिंबा असल्याचे प्रा. सकटे यांनी सांगितले.

चर्चेचे गुऱ्हाळ नको, निर्णय हवातत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण अनुसूचित जातींच्या आरक्षणाबाबत उपवर्गीकरण करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी एक कमिटी नेमली. त्याचा अहवालही सरकारला सादर केला. मात्र, कमिटी नेमून आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरी, या समितीचे काम ठप्पच आहे.

या आधीही सरकारने याप्रश्नी अनेक आश्वासने दिले आहेत. त्यामुळे आता चर्चेचे गुऱ्हाळ न लांबवता शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण होण्यासाठी आपण लेटर बॉम्ब आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याचेही प्रा. सकटे यांनी सांगितले.