पुन्हा पत्रे उडाले... झाडे पडली !
By Admin | Updated: May 29, 2014 00:35 IST2014-05-29T00:35:26+5:302014-05-29T00:35:46+5:30
सातारा जिल्ह्यात दुसर्या दिवशीही पाऊस : खंडाळ्यात नुकसान मायणीत गारा

पुन्हा पत्रे उडाले... झाडे पडली !
खंडाळा / मायणी /आदर्की : खटाव तालुक्यातील मायणी व फलटण तालुक्यातील आदर्की परिसराला बुधवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळीवारा, पाऊस आणि गारांचा तडाका बसला. यामुळे शेती पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्हीही परिसरात घरे, गोठ्यावरील पत्रे उडाले आहेत. झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्याचबरोबर खंडाळा तालुक्यात खंडाळ्यासह अनेक गावांत मुसळधार पाऊस व गारा पडल्या. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस झाला होता. झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. असे असतानाच दुसर्यादिवशी बुधवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस आणि गारांचा तडाका बसला आहे. मायणी, ता. खटाव परिसरातील कलेढोण, पाचवड, विखळे, हिवरवाडी, चितळी, म्हासुर्णे आदी गावांना या पावसाचा तडाका बसला आहे. सायंकाळी पाचनंतर सुमारे अर्धातास वादळीवारा, पाऊस आणि गारा पडत होत्या. सुपारी, लिंबूच्या आकाराच्या गारा या परिसरात पडल्या. त्याचबरोबर अनेक घरांवरील पत्रेही उडून गेले. झाडेही उन्मळून पडली आहेत. त्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील आदर्की परिसरातही बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जोरदार वादळी वार्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी गाराही पडल्या. सुपारी, लिंबूच्या आकाराच्या गारा होत्या. या अवकाळी पावसामुळे टोमॅटो, डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरातील अनेक घरे व जनावरांच्या गोठ्यावरील पत्रेही उडून गेले आहेत. आळजापूर येथे झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. आदर्की परिसरातील वाघोशी, कोºहाळे, बिबी, कापशी, आळजापूर, हिंगणगाव, सासवड येथे वादळीवार्यासह पाऊस झाला. खंडाळा तालुक्यात खंडाळ्यासह हरळी, पारगाव, म्हावशी भागात सायंकाळी पाचच्या सुमारास एक तास मुसळधार पाऊस झाला. वार्यासह गाराही पडल्या. अनेक ठिकाणी झाडे पडली. खंडाळा येथे हॉटेलवर झाडाची फांदी पडली. वीज पुरवठा खंडीत झाला आहे. (वार्ताहर)