सातारकरांनी गिरविले योगसाधनेचे धडे

By Admin | Updated: June 22, 2016 00:16 IST2016-06-21T22:15:00+5:302016-06-22T00:16:31+5:30

‘लोकमत’तर्फे आयोजन : पाच दिवसीय शिबिराचा उत्साहात समारोप

Lessons of Yoga used by Satarkar | सातारकरांनी गिरविले योगसाधनेचे धडे

सातारकरांनी गिरविले योगसाधनेचे धडे

सातारा : ‘लोकमत’आणि ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ यांच्या सुंयक्त विद्यमाने योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर दि. १७ जूनपासून पाच दिवसांचे योग शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंगळवारी जागतिक योग दिनी शिबिराचा समारोप करण्यात आला. या पाच दिवसांत नागरिकांनी योगसाधनेचे धडे गिरविले.
मंगळावारी पोवई नाका येथील राजसी शॉप व्हेन्यू येथे योग दिनानिमित्त शहरातील नागरिकांनी योगसाधनेला मोठी उपस्थिती लावली होती. आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रशिक्षक अभय चव्हाण, सुहास फरांदे, योग शिक्षिका सरिता फडतरे यांनी शिबिरार्थींना प्रशिक्षण दिले. योगाभ्यास ही भारतीयांची प्राचीन परंपरा आहे. त्याचे अनुकरण जगभरातील लोक करत
आहेत.
निरोगी जीवन अन् मन:स्वास्थ्यासाठी ध्यान, प्राणायाम, योगासने या शिबिरात शिकविण्यात आली. शिबिरात अकरा वर्षांच्या मुलांपासून ते सत्तर वर्षांच्या आजीआजोबांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. सातारा शहरातील सखी मंच सदस्य व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आर्ट आॅफ लिव्हिंगमार्फत सातारा जिल्ह्यात जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून एकाचवेळी तीनशे ठिकाणी योग शिबिरे आयोजित करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

आबालवृद्धांचा सहभाग
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या योग शिबिरात शहरातील आबालवृद्धांनी सहभागी होऊन योगसाधना केली. प्राणायाम, योगासनांचे धडे घेतले.

Web Title: Lessons of Yoga used by Satarkar